आम्ही वानरांचे नव्हे तर ऋषींचे वंशज; चार्ल्स डार्विनचा सिद्धांत खोटा?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 20 July 2019

चार्ल्स डार्विन यांनी 'द ओरिजन ऑफ स्पिसीज' या आपल्या पुस्तकात झाडं आणि सजीव प्राण्यांना देवाने वेगवेगळे तयार केल्याचे अमान्य केले आहे. त्यांच्या मते, हे सर्व जीव काही जीवांचे वंशज आहेत. त्यामध्ये काळानुसार परिवर्तन होत गेले. मासे जल-थल जंतूंमध्ये बदलले गेले आणि माकडाचे मनुष्यात रुपांतर झाले.

नवी दिल्ली : भाजपचे खासदार सत्यपाल सिंह यांनी पुन्हा एकदा चार्ल्स डार्विनच्या सिद्धांताला आव्हान दिले आहे. शुक्रवारी मानवाधिकार संरक्षण (दुरुस्ती) विधेयक २०१९ चा विरोध करण्यावरुन विरोधी पक्षांवर टीका करताना ते म्हणाले की, भारतीय संस्कृतीत कुठेही मानवाधिकाराबाबत उल्लेख नाही. याउलट सदाचारी मानवी चरित्रावर जोर दिला गेला आहे. यावर न थांबता त्यांनी चार्ल्स डार्विन यांच्या सिद्धांतालाच खोटे ठरवण्याचा प्रयत्न केला.

भाजप (BJP) खासदार सत्यपाल सिंह यांनी पुन्हा एकदा डार्विनचा सिद्धांत खोटा ठरवला आहे. संसदेतील चर्चेत सहभागी होताना सत्यपाल सिंह म्हणाले, “मानवा हा निसर्गाची रचना आहे. आपले पूर्वज ऋषी होते. आपले वंशज वानर होते अशी ज्यांची भावना आहे, त्या मला दुखवायच्या नाहीत”

यावेळी सत्यपाल सिंह यांनी संस्कृतमधील एक दाखलाही दिला. ते म्हणाले, “मंदिर, मस्जिद, गुरुद्वारा आणि चर्चमध्ये गेल्याने धर्माची कसोटी पूर्ण होत नाही. धर्माच्या शिकवणीनुसार आपण तसं आचरण करायला हवं. जर मला त्रास होऊ नये असं वाटत असेल, तर मी सुद्धा दुसऱ्याला त्रास देऊ नये, ही धर्माची शिकवण आहे”

दरम्यान, सत्यपाल सिंह यांनी यापूर्वीही डार्विनचा सिद्धांत खोडून काढला आहे. वैज्ञानिकदृष्ट्या ते चुकीचं असून, आपण वानराचे वंशज नाही, असं ते म्हणाले होते.

काय आहे डार्विन थिअरी
चार्ल्स डार्विन यांनी 'द ओरिजन ऑफ स्पिसीज' या आपल्या पुस्तकात झाडं आणि सजीव प्राण्यांना देवाने वेगवेगळे तयार केल्याचे अमान्य केले आहे. त्यांच्या मते, हे सर्व जीव काही जीवांचे वंशज आहेत. त्यामध्ये काळानुसार परिवर्तन होत गेले. मासे जल-थल जंतूंमध्ये बदलले गेले आणि माकडाचे मनुष्यात रुपांतर झाले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News