भाजपा खासदाराच्या सुरक्षा रक्षकांचा राडा पाहाच; टोलनाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्यांना मारहाण

सकाळ (यिनबझ)
Saturday, 6 July 2019

लोकशाहीला तसेच व्यक्तिस्वातंत्र्याला काळिमा फासणारी घटना आज भारतात घडली. भाजपा खासदाराच्या सुरक्षा रक्षकांनी टोल नाक्यावर गोळीबार केल्याचे वृत्त समोर आले आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे हि घटना घडत असताना खासदार स्वतः तिथे उपस्थित होते.

 

लोकशाहीला तसेच व्यक्तिस्वातंत्र्याला काळिमा फासणारी घटना आज उत्तर प्रदेशात घडली. भाजपा खासदाराच्या सुरक्षा रक्षकांनी टोल नाक्यावर गोळीबार केल्याचे वृत्त समोर आले आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे हि घटना घडत असताना खासदार स्वतः तिथे उपस्थित होते.

आग्याजवळील टोलनाक्यावर हा प्रकार घडला. जेव्हा भाजपा खासदार राम शंकर काथेरिया गाडीतून प्रवास करत होते, आणि टोल नाक्यावर त्यांना वाहनांना थांबविण्यात आले. यावरून  झालेल्या बाचाबाचीनंतर त्यांच्या सुरक्षरक्षकांनी आग्रा टोल नाक्यावर  तेथील कर्मचाऱ्यांना मारहाण करुन हवेत गोळीबार केला. एका वृत्तसंस्थेने या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ टि्वटरवर पोस्ट केला आहे.

 

या क्लीपमध्ये  बंदुक काढण्याआधी राम शंकर काथेरीया यांचे सुरक्षा रक्षकांनी तेथील कर्मचाऱ्यांना मारहाण केली. त्यानंतर हवेत गोळीबार केला. एका सुरक्षा रक्षकाने टोल नाक्यावरील कर्मचाऱ्याला ढकलले तर दुसऱ्याने हवेत गोळी चालवली. ही घटना घडली तेव्हा राम शंकर काथेरीया तिथे स्वतः उपस्थित होते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News