भाजपमध्ये "मेगाभरती"; काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दिग्गज आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश; पाहा व्हिडीओ

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 31 July 2019
  • येत्या विधानसभेत भाजप आणि शिवसेनेने मोठी रणनीती आखल्याचे पहायला मिळत आहे.
  • यामुळेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला गळती लागल्याचे पहायला मिळत आहे.

मुंबईः  काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मोठी खिंडार पडल्याचं पाहायला मिळत आहे. सर्च भाजपच्या वाटेवर असल्याचे दिसून येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या या पक्षांतरात आता दिग्गज नेत्यांचा देखील समावेश झाला आहे. यावरूनच एकंदरीत भाजपमध्ये आज ३१ जुलै रोजी मेगाभरती झाल्याचे पहायला मिळत आहे.

आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अकोले येथील आमदार वैभव पिचड, सातारा जावळीचे शिवेंद्रराजे भोसले, ऐरोलीचे आमदार संदीप नाईक आणि काँग्रेसचे वडाळा मतदारसंघातील आमदार कालिदास कोळंबकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह मंत्री गिरीश महाजन, आशिष शेलार आणि विनोद तावडे यांच्या उपस्थितीत गरवारे क्लबमध्ये  पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला.

 

येत्या विधानसभेत भाजप आणि शिवसेनेने मोठी रणनीती आखल्याचे पहायला मिळत आहे. यामुळेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला गळती लागल्याचे पहायला मिळत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या चारही आमदारांनी कालच आपले राजीनामे विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्याकडे सुपूर्द केले. या चारही आमदारांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री गणेश नाईक तसंच राष्ट्रवादीच्या माजी महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, नवी मुंबईतील काही नगरसेवकांसह राज्यभरातून पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश केला.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News