आमदाराच्या मुलाने पालिकेच्या अधिकाऱ्यांना बॅटने केली बेदम मारहाण

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 26 June 2019
  • कैलाश विजयवर्गीय यांच्या आमदार मुलाची दादागिरी

  • पालिकेच्या अधिकाऱ्यांना बॅटने मारहाण

  • आकाश विजयवर्गीय इंदुर-3 मतदारसंघातून आमदार

मध्यप्रदेश-   इंदौर शहरातील भाजपचे महासचिव कैलाश विजयवर्गीय यांचा आमदार मुलगा आकाश विजयवर्गीयने आज महानगर पालिकेच्या दोन अधिकाऱ्यांना बॅटने बेदम मारहाण केली. नगर पालिकेची एक तुकडी गंजी कंपाउंडमध्ये एका जुन्या जिर्ण झालेल्या घराला तोडण्यासाठी आली होती. यादरम्यान स्थानिकांनी आकाशला बोलावले. त्यानंतर अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बाचाबाचीनंतर आकाश आणि त्याच्या समर्थकांनी दोन अधिकाऱ्यांना बेदम मारले. यादरम्यान स्वतः आकाशने अधिकाऱ्याला बॅटने मारले. आकाश इंदुर-3 मतदारसंघातून आमदार आहे.

 

 काय आहे प्रकरण ?
घर तोडण्यासाठी अधिकारी आल्यावर स्थानिकांनी आकाशला बोलावले. त्यानंतर अधिकारी आणि आकाश यांच्यात वाद झाला. त्यानंतर आकाश यांच्या कार्यकर्त्यांनी जेसीबीची चावी काढून घेतली. त्यानंतर अधिकाऱ्यांना 10 मिनीटात येथून निघून जा नाहीतर जे होईल त्याची जबाबदारी तुमची असेल, अशी धमकी आकाशने अधिकाऱ्यांना दिली. यादरम्यान अधिकाऱ्यांसोबत बाचाबाची झाली. त्यानंतर आकाशने बॅटने अधिकाऱ्यांना मारणे सुरू केले. त्यानंतर पोलिस आणि इतर लोकांनी कसे-बसे आकाशला शांत केले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News