मराठा आरक्षणाचा फायदा भाजपला होणार ? भाजप नेते स्वबळावर लढण्यास उत्सुक !

सकाळ वृत्तसेवा यिनबझ
Monday, 29 July 2019

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने प्रलंबित मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्‍न सोडविला आहे. त्याचा राजकीय फायदा भाजपला मिळणार असून, सुमारे पाच टक्‍के इतकी मते पक्षाकडे झुकली आहेत.

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने प्रलंबित मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्‍न सोडविला आहे. त्याचा राजकीय फायदा भाजपला मिळणार असून, सुमारे पाच टक्‍के इतकी मते पक्षाकडे झुकली आहेत.

विधानसभा निवडणुकीत स्वबळावर १५० पेक्षा जास्त जागा भाजपला मिळणार आहेत, असे पक्षाने केलेल्या सर्वेक्षणात समोर आले आहे. यामुळे शिवसेनेबरोबरची युती तोडून २०१४ प्रमाणे दोन्ही पक्षांनी वेगवेगळे लढावे, यासाठी भाजपमधील एक गट सक्रिय झाला असल्याचे सूत्रांकडून समजते.

मागील लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना आणि इतर घटकपक्ष महायुतीच्या झेंड्याखाली लढले होते. त्याआधी भाजपने चर्चेचे गुऱ्हाळ शेवटपर्यंत लांबवत ऐनवेळी शिवसेनेबरोबरील युती तोडून स्वबळावर विधानसभा लढवली होती. याचा लाभ भाजपला त्या वेळी झाला आणि १२३ जागा मिळवत भाजपने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सत्ता स्थापन केली.

याचप्रमाणे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीतदेखील भाजपने स्वबळावर लढावे. राज्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी पाच वर्षांचा कालावधी पूर्ण केला असून, मराठा समाजाच्या आरक्षणाचा कळीचा मुद्दा सोडविला आहे. यामुळे भाजपच्या मतात पाच टक्‍के इतकी वाढ होऊ शकते, अशी माहिती सर्वेक्षणातून पुढे आली आहे. 

विजयी उमेदवारांना प्राधान्य द्यावे
भाजपने स्वबळावर निवडणूक लढवावी, या मताच्या भाजपमधील गटाचे म्हणणे आहे, की ज्या ठिकाणी भाजपची ताकद कमकुवत आहे, अशा ठिकाणी इतर पक्षातील ताकदवान उमेदवाराला पक्षप्रवेश देऊन ती जागा बळकट करावी. काँग्रेस, राष्ट्रवादीतील अनेक आजी आणि माजी नेते भाजपत प्रवेश करण्यासाठी रांगेत आहेत, असे म्हणणे या गटाचे आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News