संजय राऊत यांची विचारपूस करण्यासाठी भाजपच्या नेत्यांनी घेतली भेट

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 12 November 2019

संजय राऊत यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी भाजपचे नेते आशिष शेलार आणि हर्षवर्धन पाटील यांनी रुग्णालयात जाऊन भेट घेतली. यावेळी आशिष शेलार म्हणाले कि, वैचारिक मतभेद असो किंवा नसो, एकमेकांच्या प्रकृतीची विचारपूस करणे हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला धरुन आहे.

मुंबई - गेले काही दिवस मुख्यमंत्रीपद कोणाला मिळणार यावरुन सगळीकडे चर्चा सुरु असताना आमचं ठरलय असं म्हणणाऱ्या भाजप-शिवसेनेचे मुख्यमंत्रीपदावरून मतभेद झाले. या सर्व घडामोडींमध्ये शिवसेनाचे खासदार संजय राऊत यांना काल दुपारी मुंबईमधील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

संजय राऊत यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी भाजपचे नेते आशिष शेलार आणि हर्षवर्धन पाटील यांनी रुग्णालयात जाऊन भेट घेतली. यावेळी आशिष शेलार म्हणाले कि, वैचारिक मतभेद असो किंवा नसो, एकमेकांच्या प्रकृतीची विचारपूस करणे हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला धरुन आहे. तसेच संजय राऊत यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आलो, यामागे कोणतेही राजकीय कारण नाही.

संजय राऊत यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली असून त्यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये दोन ब्लॉक आहेत. अँजिओग्राफी झाल्यानंतर त्यांच्यावर लिलावती रुग्णालयात अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News