भाजपच्या 'या' नेत्याला मिळाली आजन्म कारावासाची शिक्षा !

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 12 July 2019
  • भाजपचे माजी खासदार दिनू भोगा सोळंकी आणि अन्य सहा जणांना आजन्म कारावासाची शिक्षा

अहमदाबाद : माहिती अधिकार कार्यकर्ते अमित जेठवा यांच्या खूनप्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयाने आज भाजपचे माजी खासदार दिनू भोगा सोळंकी आणि अन्य सहा जणांना आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली.

जेठवा यांनी २०१० मध्ये गीर अभयारण्यातील बेकायदा उत्खननाचा पर्दाफाश करण्याचा प्रयत्न केला होता, आणि त्यादरम्यान 20 जुलै 2010 रोजी अमित जेठवाचा खून झाला. अभयारण्यातील बेकायदेशीर खाणींविरुद्ध अमित आरटीआय लावत होते, त्या दरम्यान त्याची हत्या करण्यात आली.

हत्येनंतर गुजरात पोलिसांनी तपास केला होता, आणि त्यातून हे निष्पन्न झाले की, या हत्येमागे दिनू सोळंकीची कोणतीही भूमिका नव्हती. नंतर आरटीआय कार्यकर्त्या अमितच्या वडिलांच्या याचिकेवर उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचा आदेश दिला होता. आणि नंतर दिनू सोळंकी आणि त्याचे साथीदार या हत्येत सहभागी आहेत हे सिद्ध झाले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News