काँग्रेसच्या दुर्लक्षितपणामुळे चीनने केली भारतात घुसखोरी, भाजपच्या या नेत्याने केला आरोप

सकाळ (यिनबझ)
Monday, 19 August 2019

नामग्याल म्हणाले,

  • राहुल गांधींना फक्त खुर्ची हवी
  • काँग्रेस ५५ वर्षे गप्पच बसली
  • काश्‍मीरमुळेच लडाखचे नुकसान
  • लडाखला थेट निधी मिळेल
  • या भागाचा भूगोल कुणाला समजलाच नाही 
  • बाहेरचे लोक येथे जमिनी घेणार नाहीत
  • आम्ही स्थानिकांसाठी आरक्षण मागू
  • लडाखला आदिवासी भाग जाहीर करावे

लेह : राज्यघटनेतील कलम ३७० वरून संसदेमध्ये केलेल्या धडाकेबाज भाषणामुळे चर्चेत आलेले भाजपचे लडाखमधील खासदार जामयांग त्सेरिंग नामग्याल यांनी काँग्रेसवर पुन्हा निशाणा साधला आहे. काँग्रेसने लडाखला महत्त्व न दिल्यानेच चीनने देमचोक भागामध्ये घुसखोरी केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

‘‘काँग्रेसने केवळ लांगूलचालनाचे धोरण अवलंबिल्याने काश्‍मीरची दुरवस्था झाली असून, लडाखचेही दोन्ही बाजूंनी नुकसान झाले आहे. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी काश्‍मीरबाबत आगेकूच करण्याचे धोरण अवलंबिले होते. यामध्ये आपण चीनच्या दिशेने इंचाइंचाने जाणे अपेक्षित होते; पण याच धोरणाची अंमलबजावणी करताना मात्र ते ‘माघारी फिरा’ धोरण बनले. यामुळे चिनी सैनिक हे भारतीय हद्दीमध्ये घुसतच राहिले आणि आपण मात्र मागे येत गेलो, असेही नामग्याल यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

संरक्षणाकडे दुर्लक्ष
सध्या अक्‍साई चीनचा भाग हा पूर्णपणे चीनच्या ताब्यात असून पीपल्स लिबरेशन आर्मीचे सैनिक नेहमीच लडाखमध्ये घुसखोरी करतात. काँग्रेसच्या ५५ वर्षांच्या राजवटीमध्ये संरक्षण धोरणांना कधीच महत्त्व मिळू शकले नाही, त्यामुळे हे झाल्याचे त्यांनी सांगितले.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News