तरुणीच्या तत्परतेमुळे बाळाचा झाला सुखरुप जन्म    

सकाळ वृतसेवा (यिनबझ)
Monday, 3 June 2019
  • सेवाग्राम रेल्वे स्थानकावर झाली महिलेची प्रसूती 
  • प्रतीक्षा गृह झाले लेबर रूम: कालपुरच्या ‘महिलेने दिला बाळाला जन्म' 

 

वर्धा : काचीगुडा एक्सप्रेसने प्रवास करीत असलेल्या महिलेला सेवाग्राम रेल्वे स्थानकालगत प्रस्तूतीची कळा सुरु झाली. ही माहिती रेल्वे पोलिसांना मिळताच ‘महिला रेल्वे पोलीस महिलेला रेल्वे स्थानकावर उतरवून घेतले. डॉक्टरांना बोलवून रेल्वे स्थानकाच्या प्रतीक्षा गृहात सदर महिलेची प्रसूती केली. या महिलेचे नाव फ़ेजीना बानो असे असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली. 

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कानपूर येथील फेजीना बानो ही पती महमूद इम्तियाज याच्यासह काचीगुडा एक्स्प्रेसने प्रवास करीत होती. फेजीना ही गर्भवती होती. सदर रेल्वे गाडी स्थानकापर्यंत पोहोचली असता तिला प्रसूत कळा सुरू झाल्या. हा त्रास असह्य होत असल्याने याची माहिती लगतचे रेल्वेस्थानक म्हणून सेवाग्राम रेल्वे पोलिसांना देण्यात आली. यावेळी कार्यरत असलेली ‘महिला पोलिस कर्मचारी रेणुका श्रीवास हिने ही तक्रार हाताळली. गाडी स्थानकावर येण्यापूर्वीच तिने घटनेची माहिती डॉक्टरांनी दिली. गाडी रेल्वे स्थानकावर येण्यापूर्वीच डॉक्टर आपल्या सहकार्यासह रेल्वे स्थानकावर पोहोचल्या. या ‘महिलेची तपासणी केली असता तिची तत्काळ प्रसूती होणे गरजेचे असल्याचे निदर्शनास आले. यामुळे उपस्थित डॉ. ज्योती यांनी रेल्वे स्थानकाच्या प्रतीक्षा गृहात सदर महिलेची प्रसूती केली. 

यावेळी सदर महिलेने एका गोंडस बालाला जन्म दिला. वेळीच उपचार मिळाल्याने माता आणि बाळाचे प्रकृती सुदृढ असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. प्रसूतीनंतर सदर महिलेला येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथून काही वेळातच सदर महिला सुटी घेत हैदराबादसाठी रवाना झाल्याचे सांगण्यात आले.  

पोलिस आणि डॉक्टरांची तत्परता 
गर्भवती महिलेला प्रवासात होत असलेल्या कळांची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी रेल्वे पोलिसच्या महिला कर्मचाऱ्यांनी आणि माहिती मिळताच रेल्वे स्थानक गाठणाऱ्या डॉक्टरांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे महिलेची वेळेवर आणि सुखरूप प्रसूती झाली. यामुळे दोघांचेही सर्वत्र कौतुक होत आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News