मानवतेचा सर्वात मोठा शत्रू हा दहशतवाद : मोदी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 29 June 2019
  • मोदींचे प्रतिपादन : ‘ब्रिक्‍स’च्या प्रमुखांशी चर्चा

ओसाका : दहशतवाद हा मानवतेचा सर्वांत मोठा शत्रू आहे. दहशतवादामुळे फक्त निष्पाप नागरिकांचेच बळी जात नाहीत, तर त्याचा परिणाम आर्थिक विकास आणि सामाजिक स्थैर्यावरही होतो, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले.

जी-२० शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी येथे दाखल झालेल्या ब्रिक्‍स देशांच्या प्रमुखांच्या अनौपचारिक बैठकीत ते बोलत होते. दहशतवाद आणि वंशवादाला केली जाणारी कुठल्याही स्वरूपाची मदत थांबविण्याची गरज असल्याचेही मोदींनी या वेळी स्पष्ट केले. या बैठकीवेळी ब्राझीलचे अध्यक्ष जैर बोलसोनारो आणि दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरील रामाफोसा यांचे मोदींनी अभिनंदन केले. 

उपस्थित नेत्यांना संबोधित करताना मोदी म्हणाले, की अस्थैर्य आणि जागतिक अर्थव्यवस्थेची मंदावलेली गती हे सध्याचे मोठे आव्हान आहे. एककल्लीपणा आणि स्पर्धात्मकतेमुळे नियमांवर आधारीत बहुपातळीवरील जागतिक व्यापार यंत्रणेला फटका बसतो आहे. तसेच स्रोतांचीही मोठ्या प्रमाणात कमतरता आहे. त्यामुळे एकट्या पायाभूत सुविधा क्षेत्रात १.३ ट्रिलियन डॉलरच्या गुंतवणुकीची कमतरता जाणवत आहे. सर्व समावेशक आणि शाश्‍वत विकासाचे मोठे आव्हानही आपल्या समोर आहे. असमानता दूर करणारा आणि सशक्तीकरण करणारा विकास आवश्‍यक आहे.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News