बिग बॉस फेम अभिजित बिचुकलेला जामिन 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 24 July 2019

सातारा : बिग बॉस फेम अभिजित बिचुकले याला शासकीय कामात अडथळा आणल्याच्या एका गुन्ह्यामध्ये आज जामिन मंजूर झाला. मात्र, खंडणीच्या गुन्ह्यात अद्याप जामिन नसल्याने त्याचे कारागृहातून बाहेर येणे निश्‍चीत नाही.  धनादेश न वठल्याच्या एका गुन्ह्यामध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने बिचुकलेला बिग बॉसच्या सेटवरून ताब्यात घेतले होते. 

त्या गुन्ह्यात त्याला जामिन मिळाला. परंतु, 2015 सालच्या खंडणीच्या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. या गुन्ह्यामध्ये त्याचा जामिन अर्ज जिल्हा तसेच उच्च न्यायालयाने फेटाळलेला आहे. त्यामुळे सध्या त्याचा मुक्काम जिल्हा कारागृहातच आहे.

दरम्यान, त्याच्यावर एका पोस्टमनशी वाद घालत शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यामध्ये त्याच्यावतीने ऍड. श्रीकांत हुटगिकर यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकल्यानंतर त्या गुन्ह्यात न्यायालयाने त्याला जामिन मंजूर केला. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News