#bigboss - बिग बॉस मध्ये नसूनही या अभिनेत्रीला मनस्ताप

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 17 June 2019
  • बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सीझनला नुकतीच सुरूवात झाली आहे.
  • हिंदी प्रमाणेच मराठी बिग बॉस ने  देखील प्रेक्षकांची मन जिकली आहेत.
  • स्पर्धकांमुळे  तसेच वेगवेगळ्या टास्क मुळे मराठी बिग बॉस प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय ठरले आहे. 

बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सीझनला नुकतीच सुरूवात झाली आहे. हिंदी प्रमाणेच मराठी बिग बॉस ने  देखील प्रेक्षकांची मन जिकली आहेत. स्पर्धकांमुळे  तसेच वेगवेगळ्या टास्क मुळे मराठी बिग बॉस प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय ठरले आहे. 

बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सीझनला नुकतीच सुरूवात झाली आहे. या शोमध्ये अभिनेत्री किशोरी शहाणे सहभागी झाल्या आहेत पण, सोशल मीडियावर किशोरी शहाणे ऐवजी रेणुका शहाणे यांना टॅग केलं जात आहे. रेणुका शहाणे यांना याचा फार मनस्ताप झाला आहे.त्रस्त झालेल्या रेणुका शहाणे यांनी ट्विटरवर संताप व्यक्त केलाय.

त्यांनी ट्विट केले की, ‘मी किशोरी शहाणे नाही आणि मी बिग बाॅसमध्ये नाही. माझा ह्या कशाशीच काहीही संबंध नाही! कृपया मला टॅग करू नका. समाज माध्यमांचा गैरवापर टाळा. आणि कृपया विचार करा.’ कलाकारांना बऱ्याचदा सोशल मीडिया वर ट्रोलिंग चा सामना करावा लागतो. मात्र नुकतेच शहाणे आडनावामुळे त्यांना सोशल मीडियावर मनस्ताप सहन करावा लागतोय.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News