बिग बॉसच्या घरात दिवसाची सुरवातच नागीण डान्सने

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 4 June 2019

बिग बॉसच्या घरात स्पर्धक सकाळी उठल्याबरोबर नागीण डान्स करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे.

मुंबई : बिग बॉसचे घर म्हणजे अतिशय बेभरवशाचे ठिकाण. इथे कधी काय होईल याचा अंदाज कोणालाच नसतो. बिग बॉस मराठीच्या नव्या पर्वाला सुरवात झाली आहे. या घरात सकाळी झोपेतून उठल्या उठल्या स्पर्धक काय करत असतील हे पाहिल्यावर तुम्ही थक्क व्हाल.

बिग बॉसच्या घरात स्पर्धक सकाळी उठल्याबरोबर नागीण डान्स करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये किशोरी शहाणे, वैशाली माडे यांच्यासह इतर स्पर्धकाही नागीण डान्स करताना दिसत आहेत.

 

आता बिग बॉसच्या घरात नागीण डान्स सुरु झालाय, आता दिलसभर कोण कोणाला डसतंय हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. या घरात आता स्पर्धकांमध्ये पहिल्या टास्कसाठी गटबाजीही झाली आहे. एक ग्रुपचे नेतृत्व अभिजीत बिचुकले तर दुसऱ्या ग्रुपचे नेतृत्‍व वैशाली माडेकडे सोपविण्‍यात आले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News