बिग बॉस २ चा शिवानीच्या करियर वर परिणाम?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 16 June 2019
  • झालेल्या  भागात आपण पाहिलं असेल तर शिवानी सुर्वे हिला शोचे अँकर महेश मांजरेकर यांनी तिला घरातून बाहेर निघून जा असे सांगितले

बिग बॉस सिजन 1, ने खूप प्रसिद्धी मिळवली होती, तसेच बिग बॉस सिजन 2  हा सध्या खुप प्रसिद्ध मिळवत आहे. हा शो संपूर्ण महाराष्ट्रात पाहिल जातो. हिंदी बिग बॉस प्रमाणे मराठी बिग बॉसही प्रेक्षकांची मन जिंकताना दिसतो आहे. वेग-वेगळे टास्क, चॅलेंजस स्वीकारताना स्पर्धकांच्या नाकी नऊ येतानाची स्थिती केव्हा केव्हा पाहायला मिळते.

बिग बॉस शो हा सुरवाती पासून हा चर्चेत आहे. नुकतंच झालेल्या  भागात आपण पाहिलं असेल तर शिवानी सुर्वे हिला शोचे अँकर महेश मांजरेकर यांनी तिला घरातून बाहेर निघून जा असे सांगितले आहे. आणि या निर्णयाचा प्रेक्षकांना धक्काच बसला. 

बिग बॉस 2 मध्ये सर्वात जास्त चर्चेचा स्पर्धक ही शिवानी सुर्वे आहे. घरच्यांची आठवण येते हा किस्सा तिचा तर प्रचंड प्रमाणात गाजला होता. जर का आपण मागचे भाग पाहिले तर शिवानी प्रत्येक वेळेस कॅमेरावर बोलत असते. मला येथे राहायचा नाही, मला जमत नाही. अशा अनेक गोष्टी कॅमेरा समोर शिवानी स्पष्टपणे सांगताना दिसून आली आहे. 

कालच्या भागात महेश मांजरेकर आणि शिवानीमध्ये वाद   होतांना दिसुन आला आहे. यामुळेच काही काळ शिवानी एका बाजूला बसलेले होती. 

यानंतर तिला घराबाहेर जाण्याचा आदेश दिला गेला आणि शिवणीची बिग बॉस मधून रवानगी करण्यात आली, पण याचा परिणाम शिवानीच्या करिअरवर तर होणार नाही? असा प्रश्न आता निर्माण होत आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News