"बिग बी" खडूस वृध्दाच्या भुमिकेत; गुलाबो सिताबोचा फर्स्ट लुक रिलीज

सकाळ (यिनबझ)
Friday, 21 June 2019
  • गुलाबो सिताबो  चित्रपटाचं फर्स्ट लुक रिलीज
  • बिग बी खडूस वृध्दाच्या भुमिकेत 

मुंबई : बॉलिवुड सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि आयुष्मान खुराना यांच्या गुलाबो सिताबो या चित्रपटाची शुटींग लखनऊमध्ये सुरु आहे. नुकतच त्यांच्या गुलाबो सिताबो या चित्रपटाचं फर्स्ट लुक रिलीज झाला आहे. हा चित्रपट कॉमेडीवर आधारीत असुन अमिताभ बच्चन आणि आयुष्मान खुराना पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसणार आहेत. 

लखनौच्या कैसरबागमधील महमूदाबाद मैंशन या ठिकाणी गुलाबो सिताबो चित्रपटाची शुटींग सुरु आहे. या सिनेमात अमिताभ बच्चन आयुष्मान खुरानाच्या दुकान मालकाच्या भूमिकेत दिसुन येणार आहेत. अमिताभ बच्चन आणि आयुष्मान खुरानाला पहिल्यांदा एकत्र पाहण्यासाठी फॅन्सची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. 

नुकतेच, सिनेमातील मेकर्सने अमिताभ बच्चन यांचा वृध्द व्यक्तीच्या भुमिकेतील फर्स्ट लुक रिलीज केला आहे. तरण आदर्श यांनी ट्विटरवर हा लुक शेअर केला आहे. ज्यामध्ये अमिताभ बच्चन यांना सफेद दाढीसोबत चश्मा लावुन आणि बिग बी या लुकमध्ये खडूस दिसुन येतात. आता अमिताभ बच्चन आणि आयुष्यमान खुराना यांना एकत्र पाहणं इंटरेस्टिंग असेल. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News