माहीवरची टीका भारतरत्नला भोवली, असा झाला सोशल मिडीयावर ट्रोल

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 26 June 2019

काही दिवसांपूर्वी भारत विरुध्द अफगाणिस्थान यांच्यात झालेल्या चुरशीच्या सामन्यात भारत मोठ्या कष्टाने झिंकला खरा, मात्र हा सामना रंगला तो दुसऱ्याच कारणने, तो म्हणजे भारतरत्न सचिन तेंडूलकरने केलेल्या धोनीवरच्या टीकेमुळे.

काही दिवसांपूर्वी भारत विरुध्द अफगाणिस्थान यांच्यात झालेल्या चुरशीच्या सामन्यात भारत मोठ्या कष्टाने झिंकला खरा, मात्र हा सामना रंगला तो दुसऱ्याच कारणने, तो म्हणजे भारतरत्न सचिन तेंडूलकरने केलेल्या धोनीवरच्या टीकेमुळे.​

भारत विरुध्द अफगाणिस्थान या सामन्यात महेंद्रसिंहने तब्बल 52 चेंडूत 28 धावा बनवल्या होत्या. धोनीच्या या खेळीवर सचिनने नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे सर्व नेटिझन्सनी सचिनला धारेवर धरल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे.

काय म्हणाला होता सचिन...
धोनी आणि केदार या दोघांच्या भागीदारीबद्दल मी नाराज आहे, या सामन्यात दोघांनी खूपच संथ गतीने धावा काढल्या, यामुळे भारतीय संघ मधल्या फळीमध्ये खूपच कमकूवत दिसतो. मधल्या फळीच्या फलंदाजांकडे सकारात्मक इच्छाशक्तीचा मोठा अभाव वाटला, अफगाणिस्थानसारख्या संघाने दोनवेळा विश्वविजेत्या संघाला फक्त 224 धावांवर रोखलं, त्यामुळे या सामन्यात भारतीय संघ कमकूवत वाटला.

कशाप्रकारे केले जातय ट्रोल...

 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News