भाजी विकणाऱ्या अब्जपतीने, भोंदूच्या नादी लागून केली तिसऱ्या लग्नासाठी हत्या

योगिता सानप(यिनबझ)
Wednesday, 10 July 2019

दक्षिण भारतीय रेस्टोरंट चेन सरवना भवनचे मालक पी राजगोपाल यांनी मंगळवारी चेन्नईच्या सेशन कोर्टमध्ये गुन्ह्याची कबुली दिली. राजगोपाळ आणि आणखी एक आरोपी जनार्दन यांना एका कर्मचाऱ्याच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची सजा सुनावण्यात आली आहे.
 
पाहा काय घडला प्रसंग...
मद्रास हाई कोर्टाने २००९ राजगोपाळला  २००१ मध्ये संतकुमारची हत्या करण्याच्या आरोपामध्ये जन्मठेपेची सजा सुनावण्यात आली होती. सांगितले जाते की राजगोपाळने एका जोतिषाच्या सल्यावरून संतकुमारच्या पत्नीसोबत लग्न करायचे ठरवले.  त्यामुळे संतकुमारची हत्या करण्यात आली. 

राजगोपाळला आपल्याच कर्मचाऱ्याची पत्नी जीवाज्योतीसोबत लग्न करायचे होते. त्यासाठी त्याने संतकुमारची हत्या केली.  राजगोपाल अंधश्रद्धा वर डोळे बंद करून विश्वास ठेवत  होते. ज्योतीशांनी सांगितले होते की जर हे तिसरे लग्न झाले तर राजगोपाळ यांच्या व्यवयात तेजी येणार होती. 

सध्या राजगोपाळ यांचे भारतात 39 ठिकाणी तर विदेशात 43 ठिकाणी आउटलेट्स आहेत. राजगोपालचे वडील तामिळनाडूमध्ये तुतिकोरिन भागात कांद्याची शेती करत होते. परंतु त्यापेक्षा पुढे त्यांना जायचे होते.  त्यामुळे ते मद्रासला आले होते. इथे त्यांनी भाजीचे दुकान टाकले . ३० वर्षांपूवी मद्रास मध्ये फार कमी  खाण्याची दुकाने असायचे. त्या वेळेस त्यांना रेस्टॉरंट खोलण्याचा सल्ला एका जोतिषाने दिला होता. जोतिषाचा सल्ला एकूण रेस्टॉरंटचा व्यवसाय सूरु करणाऱ्या राजगोपाळांना तिथून पुढे प्रत्येत व्यवसायात वृध्दी येऊ लागली.

राजगोपाळ यांनी चेन्नईमध्ये सण १९८१ला पहिले रेस्टॉरंट स्थापित केले. वडीलांसोबत त्यांचा बिसनेस ते सांभाळू लागले. राजगोपाल त्या वेळेस आपल्या रेस्टोरंटमध्ये एक रुपयात एक डोसा, इडली विकायला सुरू केली, सुरुवातीला त्यांना स्वस्त दर लावल्यामुळे फार तोट्यात जावे लागले, मात्र याचा फायदा असा झाला की राजगोपालच्या दुकानावर गर्दी दिसू लागली. बघता बघता त्याचा बिसनेस दुनियेभर पसरला.

जीवाज्योतीला विचारल्यावर असे समोर आलेकी, ती प्रिन्स संतकुमार वर प्रेम करत होती, ते दोघे लग्न करणार होते. राजगोपाळांच्या जबरदस्तीमुळे आम्ही लवकर लग्न केलं. ही गोष्ट राजगोपाळला सहन न झाल्याने जीवाज्योतीच्या लग्नांनंतरही राजगोपाळ जीवाज्योती आणि प्रिन्स संत कुमारला त्रास देऊ लागला.

हे सगळे सुरू असताना राजगोपाळने ८ लोकांना प्रिन्स संत कुमारला मारायची सुपारी दिली. आरोपींनी चेन्नईत संतकुमारचे  अपहरण केले आणि त्याची हत्या केली. हा प्रकार २००१ मध्ये घडला होता, तब्बल 18 वर्षानंतर कोर्टामध्ये जीवाज्योतीला न्याय मिळाला.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News