येथे मिळतेय 'भैंस की आंख', नेटिझन्सकडून होतेय 'त्यांची' प्रशंसा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 7 June 2019

पुणे : 'भैंस की आंख' हे ऐकून तुम्हाला हे काय नवीन? असा प्रश्न पडला असेल, पण हे एका भारतीय कंपनीचं 'ब्रॅन्डनेम' आहे. ही 'भैंस की आंख' एका पादत्राणं निर्मिती करणारी कंपनी आहे. या कंपनीनं आपल्या उत्पादनाची विक्री अमेझॉनद्वारे ऑनलाईन पद्धतीनं सुरू केलीय. 'अमेझॉन'वर 'भैंस' असं सर्च केलंत तर तुम्हाला या कंपनीचे चप्पलशिवाय आणखीही काही उत्पादनंही दिसतील. उत्पादनापेक्षा कंपनीचं जरा हटके असलेलं नावच ग्राहकांचं लक्ष वेधून घेण्यात जास्त यशस्वी ठरतंय.

या कंपनीच्या चप्पलांच्या किंमतीही कमी दरात उपलब्ध आहेत... त्याची नेटीझन्सनं प्रशंसाही करत आहेत. 'दीर्घकाळ कामाच्या थकव्यानंतर आमच्या चप्पल परिधान केल्यानं तुम्हाला आराम मिळेल. तुम्हाला नरम, गरम, मुलायम आणि आरामदायक चप्पल खरेदी करायची असतील तर हे तुमच्यासाठीच आहे', असं कंपनीनं आपल्या उत्पादनाविषयी म्हटलं आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News