'हे' आहे सर्वोत्तम, कर्णपीडासन

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 2 July 2019

मुबंई : हे शयनस्थितीमधील आसन आहे. हलासनाचा व्यवस्थित सराव झाल्यावर कर्णपीडासनाचा अभ्यास सुरू करावा. प्रथम पाठीवर झोपावे. त्यानंतर, दोन्ही पाय सावकाश वर उचलून उत्तानपादासन करावे. आता श्‍वास घ्यावा व तो सोडत कंबर, पाठ जमिनीवरून हळूहळू वर उचलून डोक्‍याच्या वरील दिशेने घ्यावी. हलासनाची स्थिती पूर्ण झाल्यावर दोन्ही पायांत साधारण अर्ध्या फुटांचे अंतर घेऊन दोन्ही पाय गुडघ्यांत वाकवावेत. डावा गुडघा डाव्या कानाजवळ व खांद्याजवळ जमिनीला टेकेल, याप्रमाणे घ्यावा. त्याचप्रमाणे, उजवा गुडघा उजव्या कानाजवळ व खांद्याजवळ जमिनीला टेकेल, असा घ्यावा.

छायाचित्रात दाखविल्याप्रमाणे आसनस्थिती घेण्याचा प्रयत्न करावा.  हाताने कान बंद करावेत. आसनाच्या अंतिम स्थितीमध्ये श्‍वसन संथ सुरू ठेवावे. पोटरी व मांडीमध्ये साधारणत: काटकोन होईल. गळ्यावर पूर्ण दाब आल्याने जालंधर बंध बांधला जातो. थायरॉईड या व्याधीवर हे आसन उपयुक्त आहे. पोटाच्या स्नायूंवर दाब आल्याने त्यांची कार्यक्षमता सुधारते. पाठीच्या कण्याची लवचिकता वाढते. मानदुखी, रक्तदाब, व्हर्टिगोचा त्रास असेल किंवा कोणतीही शस्त्रक्रिया झालेली असल्यास प्रथम डॉक्‍टर किंवा योगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News