६ ऑगस्टपासून बेस्ट कर्मचारी संपावर

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 23 July 2019

कर्मचारांच्या मागण्या 

  1. बेस्ट उपक्रमाचा अर्थसंकल्प महापालिकेत समाविष्ट करावा
  2. वेतन करार
  3. निवृत्त कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युईटी
  4. मार्च २०१६ मध्ये मुदत संपलेला वेतन करार पुन्हा करावा
  5. कर्मचाऱ्यांची निवासस्थाने

मुंबई : विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेस्ट उपक्रमातील कर्मचारी ६ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून संपावर जातील, असा इशारा बेस्ट वर्कर्स युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांनी दिला आहे.

बेस्ट उपक्रमाचा अर्थसंकल्प महापालिकेत समाविष्ट करावा, वेतन करार, निवृत्त कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युईटी, मार्च २०१६ मध्ये मुदत संपलेला वेतन करार पुन्हा करावा, कर्मचाऱ्यांची निवासस्थाने आदी मागण्यांसाठी बेस्ट कर्मचाऱ्यांनी ६ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून संपाची हाक दिली आहे.

यापूर्वी ९ जानेवारीला सुरू झालेला संप ९ दिवस चालला होता. न्यायालयाच्या मध्यस्थीनंतर संघटनांनी संप मागे घेतला; त्यावेळी बेस्ट प्रशासनाने मागण्यांची पूर्तता करण्याबाबत आश्‍वासन दिले होते. त्यानंतर एकदाही बेस्ट प्रशासनाने युनियनला बैठकीसाठी बोलावले नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरल्याने ६ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला, असे राव यांनी सांगितले.

७ ऑगस्टला बेस्ट दिन आहे, दोन वर्षांपूर्वी कर्मचाऱ्यांचा संतापाचा उद्रेक झाला होता. आताही ६ ऑगस्टचा संप टाळण्यासाठी प्रशासनाने तोडगा काढावा; अन्यथा संप निश्‍चित असल्याचा इशारा राव यांनी दिला आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News