गेम खेळण्यासाठी मुलाच्या हातात मोबाईल दिला; मुलाने शोधून काढली वडिलांची गर्लफ्रेंड

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 20 July 2019

बंगळुरुमध्ये राहणाऱ्या एका ४३ वर्षीय व्यक्तीने आपल्या मुलाला खेळण्यासाठी म्हणून हातात मोबाईल दिला होता. मात्र १४ वर्षीय मुलाने मोबाइल मध्ये गुंतून न राहता त्याच मोबाइलमधून वडिलांचेच विवाहबाह्य संबंध शोधून काढले.

बंगळुरु : बंगळुरु मध्ये राहणाऱ्या एका ४३ वर्षीय व्यक्तीने आपल्या मुलाला खेळण्यासाठी म्हणून हातात मोबाईल दिला होता. मात्र १४ वर्षीय मुलाने मोबाइल मध्ये गुंतून न राहता त्याच मोबाइलमधून वडिलांचेच विवाहबाह्य संबंध शोधून काढले.  मोबाइलमधले वडिलांच्या प्रेयसीसोबतचे ऑडिओ रेकॉर्डिंग मुलाच्या हाती लागले. ही गोष्ट त्याने आईच्या लक्षात आणून दिली. त्यामुळे मोबाइल मुलाच्या हातात देण्याचा निर्णय नागाराजूला चांगलाच महाग पडला असून १५ वर्षाचा संसार उद्धवस्त होण्याच्या मार्गावर आहे.

११ जुलैला नागाराजूने त्याचा मोबाइल फोन मुलाला खेळण्यासाठी दिला होता. खेळता खेळता मुलाने फोन रेकॉर्डर आणि व्हॉट्स अॅप चॅट ओपन केला. त्यावेळी त्याला वडिलांचे एका महिलेसोबत प्रेम प्रकरण सुरु असल्याचे कळले. वडिल आणि संबंधित महिलेमध्ये झालेले अश्लील संवादाचे मेसेजेस त्याने पाहिले. त्याने लगेच आईला ते सर्व मेसेज दाखवले. जेव्हा पत्नीने नागाराजूला याबद्दल जाब विचारला. तेव्हा त्याने तिला मारहाण केली. 

नागाराजूचे एक महिलेसोबत प्रेम प्रकरण सुरु होते. बाणाशंकरी येथे हे कुटुंब राहते. सदर व्यक्तीच्या पत्नीने नवऱ्याविरोधात कारवाई करण्यासाठी पोलिसात धाव घेतली आहे. नवऱ्याने मारहाण केल्याचा आरोप तिने केला आहे. याबद्दल कुटुंबीयांकडे वाच्यता केली तर गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी नागाराजूने धमकी दिल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे. पत्नी शाळेत शिक्षिका आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News