बेळगाव जिल्ह्यात 52 हजार 243 पुस्तके पाण्यात, विद्यार्थांना फटका

मिलिंद देसाई
Saturday, 17 August 2019
  • पुस्तके खराब झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये रामदुर्ग व खानापूर तालुक्‍यातील विद्यार्थ्यांची संख्या अधिक 

बेळगाव: बेळगाव जिल्हात मुसळधार पावसामुळे नागरीकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे अनेक नागरिक आपले संसार पुन्हा उभे करण्यासाठी धडपड सुरु आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांची पुस्तके आणि शैक्षणिक साहित्यही पाण्यात वाहून गेले आहे. 

शिक्षण खात्याने दिलेल्या माहितीनुसार बेळगाव शैक्षणिक जिल्हातील विद्यार्थ्याची तब्बल 52243 पुस्तके मुसळधार पावसामुळे खराब झाली आहेत. घरात शिरलेल्या पाण्यामुळे पुस्तके आणि इतर साहित्य खराब झाले असून विद्यार्थ्यांना तातडीने शैक्षणिक मदत मिळने आवश्‍यक आहे. 

पंधरा दिवसांपेक्षा अधिक दिवस सातत्याने बेळगाव जिल्हात मोठ्‌या प्रमाणात पाऊस पडला त्यामुळे अनेकांची घरे पडली तसेच हजारो लोकांच्या घरात पाणी शिरले त्यामुळे नागरीकांची तारांबळ उडाली. त्याचबरोबर शाळा इमारतींचेही अधिक प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यानंतर शिक्षण खात्याने प्रत्येक शैक्षणिक जिल्हातील किती विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्याचे नुकसान झाले आहे. याचा तातडीने अहवाल देण्याची सुचना केली होती. त्यानुसार सीआरसी व बिआरसी यांनी नुकसान झालेल्या पुस्तकांची माहिती शिक्षण खात्याला पाठविली आहे. त्यानुसार बेळगाव शैक्षणिक जिल्हातील पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची पुस्तके पाण्यात भिजुन खराब झाली आहेत. 

पुस्तके खराब झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये रामदुर्ग व खानापूर तालुक्‍यातील विद्यार्थ्यांची संख्या अधिक असुन बेळगाव शहरातील विद्यार्थ्यांच्या पुस्तकांचेही मोठ्‌या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

मलप्रभा नदीवरील नवलतिर्थ धरणातून अधिक प्रमाणात पाणी सोडण्यात आले त्यामुळे रामदुर्ग तालुक्‍यातील अनेक गावांना पुराचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे या भागातील 3805 विद्यार्थी अद्यापही आसरा केंद्रात आहेत. 

बेळगाव शैक्षणिक जिल्हातील आसरा केंद्रात दाखल झालेले विद्यार्थी 

विभाग            शाळांची संख्या   विद्यार्थी संख्या
बेळगाव शहर          15             114 

बेळगाव ग्रामीण      10               74 

खानापूर                   2               228 

कित्तुर                    8                84 

बैलहोंगल                1                 15 

सौंदत्ती                   2                35 

रामदुर्ग                  36               3805     

एकुण                    74               4355 

 

आवाहन
मुसळधार पावसामुळे शैक्षणिक साहित्याचे नुकसान झालेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण खात्यातर्फे फक्‍त पुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहे. मात्र वह्या, पेन, दप्तर आदी साहित्य विद्यार्थ्यांना पुन्हा घ्यावे लागणार आहे. त्यामुळे सामाजिक संस्था व संघटना यांनी नुकसान झालेल्या विद्यार्थ्यांच्या मदतीला पुढे येणे आवश्‍यक आहे.

 

बेळगाव शैक्षणिक जिल्हातील विद्यार्थ्याच्या शैक्षणिक साहित्याचा अहवाल पाठवुन देण्यात आला असुन पुस्तकांचे नुकसान झालेल्या पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पुन्हा पुस्तके वितरीत केली जाणार आहेत. विविध संघटनांनी विद्यार्थ्यांच्या मदतीला पुढे येणे आवश्‍यक आहे. 
- ए. बी. पुंडलीक, जिल्हा शिक्षणाधिकारी 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News