कोल्हापूर, सांगलीतील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी बेळगावकरांचा पुढाकार
बेळगाव - मुसळधार पावसामुळे बेळगाव जिल्ह्यासह कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील नागरिकांना पुराचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे हजारो लोकांना पुराचा फटका बसला आहे. या लोकांच्या मदतीसाठी पुढाकार घेण्याचा निर्णय महाराष्ट्र एकीकरण समिती व इतर संघटनांच्या बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच नागरिकांनी रामलिंगखिंड गल्ली येथील रंगुबाई पॅलेस येथे पूरग्रस्तांसाठी मदत आणून द्यावी असे आवाहन केले आहे.

पूरग्रस्तांना मदत करण्याबाबत चर्चा करण्यासाठी रविवारी बसवाण गल्ली येथील मराठा बँकेच्या सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी महापौर नागेश सातेरी होते. यावेळी सातेरी यांनी कोल्हापूर व सांगली येथील जनता नेहमीच बेळगावकरांच्या मदतीला आली आहे. त्यामुळे बेळगाव जिल्ह्यातील जनतेला मदत करण्याबरोबरच कोल्हापूर व सांगली येथील लोकांनाही मदत देऊया असे मत व्यक्त केले.
माजी आमदार मनोहर किणेकर यांनी कार्यकर्ते आपल्या परीने पूरग्रस्तांना मदत करीत आहेत मात्र यापुढे नियोजनबद्धरित्या गरजू पर्यंत मदत पोहचवूया असे मत व्यक्त केले. खजिनदार प्रकाश मरगाळे यांनी 2005 मध्ये आलेल्या पुराच्यावेळीही मोठ्या प्रमाणात मदत देण्यात आली होती. त्याच प्रकारे यावेळीही मोठ्या प्रमाणात मदत करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेऊया असे आवाहन केले.
युवा समितीचे कार्याध्यक्ष शुभम शेळके, कार्याध्यक्ष धनंजय पाटील, राजु मरवे, प्रकाश पाटील, किशोर मराठे, नागेश बोबाटे, विशाल गोंडाडकर, गोपाळ हंडे, प्रभाकर पाटील यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.