राज्यात दहावी परीक्षेचे अर्ज भरण्यास सुरवात

सकाळ वृतसेवा (यिनबझ)
Wednesday, 16 October 2019
  • निवडणुकीच्या कामामुळे ऑनलाइन फॉर्म भरण्यास मिळेना वेळ

औरंगाबाद - महाराष्ट्र राज्य व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२० मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (दहावी) परीक्षेचे अर्ज भरण्यास मंगळवारपासून (ता.१५) सुरवात झाली. यासाठी नियमित विद्यार्थ्यांचे अर्ज पाच नोव्हेंबरपर्यंत तर पुनर्परीक्षार्थी, खासगी विद्यार्थी, श्रेणी सुधार योजनेंतर्गत व तुरळक विषय घेऊन परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना सहा ते १५ नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरायचे आहेत.

दहावी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज शाळांना सरल डेटाबेसवरून भरणे आवश्‍यक असल्याने त्यांची ‘सरल’वर नोंद करणे आवश्‍यक असल्याचे बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यासाठी परीक्षेचे अर्ज www.mahahsscboard.maharashtra.gov.in किंवा www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर भरायचे आहेत. तसेच पुनर्परीक्षार्थी, खासगी विद्यार्थी, श्रेणी सुधार योजनेंतर्गत व तुरळक विषय घेऊन परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज प्रचलित पद्धतीने शाळांनी भरायची आहेत.

नियमित, पुनर्परीक्षार्थी, खासगी विद्यार्थी व श्रेणी सुधार योजनेंतर्गत दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना १६ ऑक्‍टोबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना चलनाद्वारे परीक्षेचे शुल्क भरावे. मुदतीत विद्यार्थ्यांचे अर्ज न भरल्यास विलंब शुल्कासह १६ ते २५ नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरण्याची सूट देण्यात आली आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News