गाठीभेटी म्हणजे भाजपप्रवेश नव्हे : जयकुमार गोरे

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 14 June 2019
  • मुख्यमंत्री फडणवीसयांच्याशी ते आमदार झाल्यापासून माझे चांगले संबंध आहेत.
  • विविध विकासकामांसाठी मी मुख्यमंत्र्यांपासून विविध मंत्र्यांना भेटत असतो.
  • आता शरद पवार हे नरेंद्र मोदींना वा मुख्यमंत्र्यांना भेटले म्हणजे ते भाजपमध्ये गेले असे नाही.

सातारा: मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी ते आमदार झाल्यापासून माझे चांगले संबंध आहेत. विविध विकासकामांसाठी मी मुख्यमंत्र्यांपासून विविध मंत्र्यांना भेटत असतो. आता शरद पवार हे नरेंद्र मोदींना वा मुख्यमंत्र्यांना भेटले म्हणजे ते भाजपमध्ये गेले असे नाही. त्यामुळे माझ्याबाबतीत चुकीचा अर्थ कशाला लावता, असा खोचक सवाल करत माण- खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी भाजप प्रवेशाच्या प्रश्‍नाला बगल दिली. 

शासकीय विश्रामगृहात त्यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. पत्रकार परिषद सुरू असतानाच माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर तेथे आले व त्यांनीही पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी त्यांना आमदार गोरे यांचा भाजप प्रवेश कधी होईल, असे विचारले असता ते म्हणाले, आम्हाला या प्रश्‍नावर विचार करण्यास वेळच मिळालेला नाही.

गेले 12 दिवस आम्ही नीरा- देवघरच्या पाण्याबाबत मुख्यमंत्र्यांसह जलसंपदामंत्र्यांना भेटत होतो. तर आमदार गोरे म्हणाले, रणजितसिंहांशी माझी चांगली मैत्री आहे. पक्ष कोणताही असला, तरी आमची मैत्री कायम राहणार आहे. आमचं बरंच काही ठरलंय. हे पहिल्या दिवसांपासून ठरलंय, त्याचे परिणाम तुम्ही आता पाहात आहात. आणखी काही दिवसांनी बरेच काही पाहायला मिळेल.''

कार्यक्रम तर आखलाय... 
ज्या दिवशी ज्या गोष्टींची गरज आहे, त्या गोष्टी त्याच दिवशी होऊन जातील. अनेकांनी मला संपविण्याचा, तसेच अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला; पण ते त्यांच्याकडून झाले नाही. ते जयकुमार गोरेला संपवू शकले नाहीत. ज्यांनी मला संपविण्याचा प्रयत्न केला त्यांचाच कार्यक्रम आखायची व्यवस्था मी केली आहे. आता माझा मित्र माझ्यासोबत आहे. त्यामुळे बरेच काही होऊन जाईल. ज्यांना 12 वर्षांत जमले नाही ते रणजितसिंहांनी 12 दिवसांत करून दाखविले, असा टोलाही आमदार गोरे यांनी मारला.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News