नोकरी मिळाली म्हणून गमवावा लागला जीव 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 26 June 2019

तेलंगणा : नोकरी सोडायला नकार दिल्याने जीव गमवावा लागल्याची घटना घडली आहे. तेलंगणामध्ये ही घटना घडली आहे.  वडिलांच्या मृत्यूनंतर मुलाला गावाचे संसाधन सहाय्य्क म्हणून नोकरी देण्यात आली होती. मात्र त्याबाबत त्याचे नातेवाईक समाधानी नव्हते. या मतभेदातूनच त्याने मुलाची हत्या केल्याचे समोर आले आहे. 

ही घटना रालापडूडू इथं घडली आहे. सी. राजू यांना त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर गावाचे संसाधन सहाय्यक म्हणून नोकरी देण्यात आली होती. पण यावर त्याचा नातेवाईक चिन्ना आनंदी नव्हता. नातेवाईक चिन्ना याने राजू यांना नोकरीवरून काढून टाकण्यासाठी खूप प्रयत्न केले. मात्र त्यावरून न हटल्याने चिन्ना याने राजू यांचा खून केला आहे.  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्ल्याच्यावेळी राजू हे अंगणामध्ये झोपले होते. चिन्ना यांनी संधी साधत धारदार चाकूने त्यांच्यावर हल्ला केला, आणि तेथून पळ काढला. सकाळी राजू यांच्या पत्नीने सांगणामध्ये पाहिले असता तिला धक्का बसला. त्यानंतर याबाबत पोलिसांना कळविण्यात आलं. 
 
Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News