...म्हणून इस्रोने चांद्रयान-२ मोहीम केली स्थगित 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 15 July 2019
  • आज 15 जुलै रोजी पहाटे २ वाजून ५१ मिनिटांनी सतीश धवन स्पेस सेंटर GSLV मार्क-३च्या मदतीने चांद्रयान-२ अवकाशात झेपवणार होते.
  • या मोहिमेसाठी भारतासह संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते.

संपूर्ण देशासह जगाचे लक्ष लागून असलेल्या चांद्रयान-२ चे प्रक्षेपण रद्द करण्यात आलं. अचानक झालेल्या तांत्रिक अडचणीमुळे चांद्रयान-२ चे प्रक्षेपण रद्द करण्यात आलं असून लवकरच नव्या तारखेची घोषणा केली जाईल, असं इस्त्रोने सांगितलं आहे. मात्र मोहीम स्थगित करण्यामागे नेमकं कारण काय हे  इस्रोचे माजी प्रमुख माधवन नायर यांनी स्पष्ट केले आहे. 

आज 15 जुलै रोजी पहाटे २ वाजून ५१ मिनिटांनी सतीश धवन स्पेस सेंटर GSLV मार्क-३च्या मदतीने चांद्रयान-२ अवकाशात झेपवणार होते. या मोहिमेसाठी 
भारतासह संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते. मात्र तांत्रिक अडचणीमुळे मोहीम रद्द करण्यात आली. दरम्यान इंधन गळतीमुळे चांद्रयान-२ थांबवण्यात आलं असण्याची शंका इस्रोचे माजी प्रमुख जी. माधवन नायर यांनी केलं आहे.

"आपल्या जवळ अद्ययावत यंत्रणा आहे त्यामुळे आपण कुठे बिघाड आहे हे ओळखू शकलो, भविष्यात मोठी अडचण निर्माण होण्यापेक्षा त्यावर आधीच उपाय योजना करणं हे केव्हाही चांगलंच. हे मिशन स्थगित करून इस्रोने योग्य निर्णय घेतला आहे. याशिवाय "या तांत्रिक अडचणीचं नेमकं कारण शोधावं लागणार आहे. अशी शंका आहे की गॅस स्टोअरेज सर्किटमध्ये गळती असू शकते. ते नेमकं शोधावं लागणार आहे. दुरुस्तीसाठी नेमका किती वेळ लागेल हे त्यानंतरच कळू शकतं," असं माधवन नायर एएनआय या वृत्त संस्थेला सांगितलं.

ही मोहीम फत्ते करण्यासाठी पुन्हा इस्रो जोमाने तयारीला लागली असून नव्या तारखेची घोषणा लवकरच करण्यात येणार आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News