...या कारणांमुळे गाजला सुपर थर्टी

यशेंद्र क्षीरसागर, सातारा
Monday, 22 July 2019

सध्याच्या सार्वजनिक जीवनात आपण प्रचंड प्रगती करत असलो आणि एकविसाव्या शतकात संपूर्ण जात असलो तरी तुला शिक्षण देणे हे खूप महत्त्वाचे आहे

समाज शिक्षण आणि विद्यार्थी हा महत्त्वाचा त्रिकोण समाजात असतो. हा त्रिकोण एकूण जितका सुंदर जितका अर्थपूर्ण तितका समाज पुढे जातो. कारण स्वतःमधील अपूर्णत्व प्रकट करणे म्हणजे शिक्षण होय असे स्वामी विवेकानंद म्हणतात तर माणसं माणसाला माणुसकी शिकवणे म्हणजेच खरे शिक्षण होय असे राष्ट्रपिता महात्मा गांधी म्हणतात हा सर्व विचार केला तर कला हा सुद्धा जीवनाचा अविभाज्य भाग करतो सत्य शिव आणि सुंदर यांचे मिलन म्हणजे कला होईल, असे साने गुरुजींनी म्हटले आहे.

आत्ताच्या जीवनातील कलेचे एक महत्त्वाचे अंग म्हणजे चित्रपट. होय नुकताच ऋतिक रोशन ने अभिनय केलेला सुपर थर्टी हा चित्रपट पाहण्यात आला आणि बघता बघता तो समाजाच्या मनावर गारुड करू लागला कोणती गोष्ट मोफत असणे कधीच योग्य नसते हे जरी खरे असले तरी शिक्षण आणि ज्ञान हे वाटत राहावे हेही तितकेच खरे आहे. 
 

सध्याच्या सार्वजनिक जीवनात आपण प्रचंड प्रगती करत असलो आणि एकविसाव्या शतकात संपूर्ण जात असलो तरी तुला शिक्षण देणे हे खूप महत्त्वाचे आहे आणि घरी आणि गरिबांना शिक्षण स्वतःच्या गरिबीमुळे आर्थिक परिस्थितीमुळे घेता येत नाही.

त्यामुळे ज्ञानदान हे सर्वोत्कृष्ट ज्ञान ठरते या चित्रपटामध्ये सत्य स्थितीवर आधारित एका ध्येयवादी शिक्षकाची कथा आणि व्यथा मांडलेले आहे या वृत्तीतूनच एक कथा आणि अर्थपूर्ण जीवन साकार होते ही कथा आहे, अशा शिक्षकांची ज्याच्या घरी गरिबी आहे दोन घास ते प्रेमाने खात आहेत परंतु उच्च शिक्षण घेण्यासाठी त्यांच्याकडे पैसा आहे ना कोणाची साथ आहे. 

मित्रांपासून मंत्र्यांपर्यंत सर्वजण त्याला धोका देतात कुणीही मदत करत नाही ही कथा आहे आनंदकुमार या गणितज्ञांची बिहार मधल्या पटना येथे श्री आनंद कुमार हे अजूनही दरवर्षी 30 विद्यार्थ्यांच्या बॅचला आयटी साठी तयार करतात हे विद्यार्थी अत्यंत गरीब आहेत. त्यांना शिक्षणच काय पण खाण्यासाठी सुद्धा पैसे नाहीत; परंतु ती प्रचंड हुशार आहेत अशा विद्यार्थ्यांची आयआयटीसाठी तयारी करून देतात घेतात. 2002 पासून हा त्यांचा ज्ञानयज्ञ सुरू आहे. या ज्ञानयज्ञ मुळे अनेकांना स्वतःचे अस्तित्व लाभले आहे. चारशेहून अधिक जणांना त्यांनी आत्तापर्यंत आयआयटीमध्ये प्रवेश मिळवून दिला आहे.

30 पैकी 30 जणांच्या बॅच सुद्धा एकाच वेळी आयटी मध्ये सिलेक्ट झाले आहेत हे सगळे विद्यार्थी गरीब गुणी आहेत. स्वतः आनंद कुमार यांनी हा अनुभव घेतला होता आणि प्रचंड गरिबीशी मुकाबला केला होता. त्यांना अनेकांनी आश्वासन दिले; परंतु त्यांना स्वतःला शिकता आले नाही.

सुपर थर्टी मध्ये नेमके हेच पाहायला मिळते कोणताही मसाला नाही तथाकथित मारामारी नाही प्रेम प्रकरण नाही झाडामागे पहिले नाही बंदिस्त लेखन बंदिस्त पटकथा आदर्श संवाद दर्जेदार दिग्दर्शन या सर्वांमुळे सजलेला सुपर थर्टी हा चित्रपट लक्षवेधक ठरतो. संपूर्ण कुटुंबाने एकत्रित पहावा असा हा चित्रपट आहे सर्व विद्यार्थ्यांनी जी एक्टिंग केली आहे. ते सर्वच अभिनेते मुलं-मुली अत्यंत दर्जेदार आहेत. भूमिकांची निवड खूप सुंदर केली आहे. 

ऋतिक रोशन च्या वडिलांची भूमिका आईची भूमिका करणारे भावाची भूमिका करणारे कलाकार असोत किंवा स्वतः ऋतिक रोशन असो यांनी या भूमिकेचा सखोल अभ्यास केल्याचे दिसते. सुरुवातीला मोठ्या क्लासमध्ये नायक नोकरी करतो परंतु हा क्लास चालवत असताना स्वतः श्रीमंत होत असताना हेच क्लास मोठे होत असतात भांडवलदार होतात आणि शिक्षणाचा धंदा बनवतात हे लक्षात आल्यावर हा नायक पुढे आपल्या जबाबदारीने आणि आपल्या सद्गुन नियम आणि माणुसकीवरचा प्रेमाने विद्यार्थ्यांवरील प्रेमामुळे स्वतः चा क्लास सुरु करतो त्यांच्यावर हल्ले होतात त्यांना खूप सामाजिक त्रास दिला जातो आर्थिक त्रास दिला जातो.  

ही सर्व आनंद कुमार यांच्या आयुष्यात घडले आहे हे सर्व दाखवताना दिग्दर्शकांनी प्रचंड अभ्यास केलेला आहे कंगना राणावत च्या गाजलेल्या क्वीनचा दिग्दर्शक विकास भल हा या चित्रपटाचा दिग्दर्शक आहे करणारांना उचला त्या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे नॅशनल अवॉर्ड प्राप्त झाले होते विकास बहिणी प्रचंड अभ्यास करून या चित्रपटाची वातावरण निर्मिती करून संपूर्ण जे सांगायचेय ते पटकथेत गुंतले आहे.

संवाद प्रसंगांची निवड पात्रांची निवड या सर्वच बाबतीत हा चित्रपट उजवा ठरला आहे संपूर्ण कुटुंबाने एकत्र पाण्याच्या बाबतीत हा चित्रपट कुठेही कमी पडत नाही त्यामुळे हा चित्रपट एक सामाजिक दस्तऐवज ठरला आहे राजस्थान या चित्रपट टॅक्सपी केला आहे संपूर्ण भारतात हा चित्रपट टॅक्स फ्री होण्याची गरज आहे.

कुठे हा चित्रपट भट्टीत उथळ होत नाही कुठे या चित्रपटात प्रचारकी थाट नाही कोणताही प्रचार केला नाही शिक्षणाचे पावित्र्य जपत असताना आणि त्याद्वारे मांडणी करत असताना कुठेही आक्रस्ताळेपणा नाही. प्रचंड दर्जेदार अभिनय आणि सुंदर लेखन आणि दिग्दर्शन यामुळे हा चित्रपट हा प्रत्येकाने पाहण्यासारखं ठरतो.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News