(ब्लॉग) जिवाभावाचा मित्र

श्रीनिवास गेडाम
Monday, 1 April 2019

उदास विमनस्क स्थितीत असतांना एखाद्या मित्र रूमवर यावा. पडलेला चेहरा बघून त्यानं हळूच विचारावं, "काय रे काय झालं? 

असा रडका चेहरा घेऊन कां बसलायेस ! इतका सुंदर कवी गझलकार तू.....कसली फालतुची टेन्शनस घेऊन बसतोयेस!!!" त्याला मनमोकळं करून सगळं सांगाव आणि त्यानं ते नीट कान देऊन ऐकावं! " इतकंच ना.... तू काळजी करू नकोस! 

तू तुझी सगळी टेन्शनस मला दे. मी आहे ना! काळजी कसली करतोयेस! चल तयार हो, बाहेर जाऊन मस्तपैकी बढीया लस्सी घेऊ त्यानंतर सिनेमाला जाऊ! जस्ट एन्जॉय यार!" मित्राच्या या असल्या लाघवी बोलण्यानं मनाचं दडपण कुठल्या कुठं काफूर होतं. मित्राच्या संगतीत संपुर्ण दिवस आनंदात जातो. कुणालातरी आपली चिंता आहे ही भावनाच मनाला बळ देते.

हल्ली चांगली मित्रमंडळी मिळणं दुर्मिळ झालं आहे.एकतरी जिवाभावाचा मित्र प्रत्येकाला असावा. मित्रत्व हे एक वेगळंच नातं आहे.  ते रक्ताचं नसलं तरी रक्ताच्या नात्याहून यत्किंचितही कमी नाही.
 
Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News