अलिबागमधील समुद्रकिनारे पर्यटकांमुळे फुलले
मंगळवारी गुरुनानक यांची जयंती असल्याने पुन्हा सरकारी सुट्टी होती. त्यामुळे सुट्ट्यांचे गणित जुळवत अनेक पर्यटकांनी अलिबागचा रस्ता धरला. त्यामुळे हॉटेल व रिसॉर्टमध्ये पर्यटकांकडून काही दिवसांपूर्वीच आगाऊ नोंदणी करण्यात आली होती.
अलिबाग : गुरुनानक जयंतीनिमित्त सरकारी कार्यालयांसह अनेक खासगी कार्यालयांना सुट्टी होती. त्यामुळे सुट्टीचे निमित्त साधत मंगळवारी सकाळी अलिबाग, नागाव, वरसोली, किहीम, आक्षी, रेवदंडा आदी अनेक समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांनी गर्दी केली होती. त्यामुळे घोडागाडी व स्पीड बोट मालकांचा व्यवसाय तेजीत होता. अनेक पर्यटकांनी घोडागाडी व उंटावर बसून समुद्र सफारी व सेल्फीचा आनंद घेतला. त्यामुळे समुद्रकिनारे पर्यटकांच्या गर्दीमुळे फुलले होते. खोल समुद्रात पोहण्यासाठी जाणाऱ्या पर्यटकांना खबरदारीचा इशारा जीवरक्षकांकडून देण्यात आला.
शनिवार व रविवारी सुट्टी होती. फक्त सोमवारी सरकारी कार्यालये सुरू होती. मात्र, मंगळवारी गुरुनानक यांची जयंती असल्याने पुन्हा सरकारी सुट्टी होती. त्यामुळे सुट्ट्यांचे गणित जुळवत अनेक पर्यटकांनी अलिबागचा रस्ता धरला. त्यामुळे हॉटेल व रिसॉर्टमध्ये पर्यटकांकडून काही दिवसांपूर्वीच आगाऊ नोंदणी करण्यात आली होती. त्यामुळे अलिबाग, नागाव, वरसोली, किहीम, आक्षी, रेवदंडा आदी अनेक समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळाली. पर्यटकांनी घोडागाडी व उंटावर बसून समुद्र सफारी अाणि सेल्फीचा आनंद घेतला. काही पर्यटकांनी समुद्रात पोहण्याचा आनंद घेतला. काही पर्यटकांनी मित्रांसमवेत तर काहींनी त्यांच्या कुटुंबीयांसमेवत मौजमजा केली. सुट्टीचा दिवस असल्याने पोलिसांनीदेखील पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पावले उचलली होती. अलिबाग पर्यटनासाठी चांगले ठिकाण आहे. त्या ठिकाणी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी वारंवार येतो. स्पीड बोट व अन्य समुद्र खेळांचा आनंद घेता येतो, असे सचिन दिसले यांनी सांगितले.