बँक फोडीचा प्रयत्न  

उमेश वाघमारे
Monday, 15 July 2019
  • भारतीय स्टेट बँकेच्या शाखेच्या गेटचे लॉक तोडून बँक फोडीचा प्रयत्न
  • रविवारी (ता.14) मध्यरात्रीनंतर घडला आहे
  •  एक संशयित सीसीटीव्हीत कैद

जालना: शहरातील गांधी चमन येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेच्या गेटचे लॉक तोडून बँक फोडीचा प्रयत्न करण्यात आला. हा प्रकार रविवारी (ता.14) मध्यरात्रीनंतर घडला आहे. दरम्यान एक संशयित सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

गांधी चमन येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेच्या चैनल गेटसह शार्टचे लॉक तोडून रविवारी (ता.14) मध्यरात्रीनंतर चोट्याने बाँकेत प्रवेश केला. त्यानंतर या चोरट्याने बाँकेतील लॉकर तोडण्याच्या प्रयत्न केला. मात्र त्याला लॉकर तोडता आले नाही.

हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॉमेऱ्यांत कैद झाला. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच एडीएसचे पोलिस निरीक्षक यशवंत जाधव, कदीम जालना पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय लोहकरे, फिंगरप्रिंट पथकासह स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दखाल झाले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News