‘फार्मसी’च्या नवीन महाविद्यालयांना बंदी; पुढील वर्षांपासून अंमलबजावणी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 26 July 2019
  • औषधनिर्माणशास्त्राची पदवी (बी. फार्म) आणि पदविका (डी. फार्म) अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला असला तरी रोजगाराची संधी कमी झाल्याचे अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेकडील आकडेवारीतून समोर येत आहे. 

शिरोली - औषधनिर्माणशास्त्राची पदवी (बी. फार्म) आणि पदविका (डी. फार्म) अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला असला तरी रोजगाराची संधी कमी झाल्याचे अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेकडील आकडेवारीतून समोर येत आहे. 

गरजेपेक्षा जास्त मनुष्यबळ निर्माण होत असल्यामुळे औषधनिर्माणशास्त्राची नवीन महाविद्यालये सुरू करण्यास औषधनिर्माणशास्त्र परिषदेने (पीसीआय) बंदी घातली आहे. त्यामुळे देशात पुढील शैक्षणिक वर्षांपासून (२०२०-२१) पाच वर्षांसाठी नवी महाविद्यालये सुरू करता येणार नाहीत.

यापूर्वी विद्यार्थ्यांचे सर्वाधिक प्राधान्य तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाला होते; मात्र इंजिनिअरिंग करूनही नोकरीसाठी वणवण फिरावे लागत आहे. परिणामी विद्यार्थ्यांनी तंत्रशिक्षणाकडे पाठ फिरवली.
पीसीआयच्या निर्णयामुळे महाविद्यालयाचा दर्जा सुधारेल व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळेल.
-प्राचार्य एस. एस. पाटील,
अशोकराव माने कॉलेज ऑफ फॉर्मसी, पेठवडगाव 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News