अशी असेल, बीएएमएस बीएचएमएस प्रवेश प्रक्रिया

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 1 August 2019

शैक्षणिक वर्ष २०१९-२०मधील आरोग्य विज्ञान शाखेतील राज्यातील शासकीय व खासगी महाविद्यालयांतील प्रवेशासाठी प्रथमच एमबीबीएस व बीडीएस शाखेसाठी तसेच बीएएमएस, बीएचएमएससाठी स्वतंत्रपणे पसंतीक्रम नोंदवून व बीपीटीएस. बीएएसएलपीसह उर्वरित कोर्ससाठी स्वतंत्रपणे अशा तीन मार्गातून सीईटी सेलतर्फे प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे.बीएएमएस, बीएचएमएस राज्यातील ८५ टक्के प्रवेश राज्यातील शासकीय, खासगी महाविद्यालयांतील ८५ टक्के जागांसाठी २१ ते २५ जुलै या कालावधीमध्ये पसंतीक्रम नोंदविल्यानंतर प्रवेशाची पहिली फेरी जाहीर झालेली असून, २ ऑगस्टपर्यंत प्रवेश घेण्यासाठीची मुदत आहे.

शैक्षणिक वर्ष २०१९-२०मधील आरोग्य विज्ञान शाखेतील राज्यातील शासकीय व खासगी महाविद्यालयांतील प्रवेशासाठी प्रथमच एमबीबीएस व बीडीएस शाखेसाठी तसेच बीएएमएस, बीएचएमएससाठी स्वतंत्रपणे पसंतीक्रम नोंदवून व बीपीटीएस. बीएएसएलपीसह उर्वरित कोर्ससाठी स्वतंत्रपणे अशा तीन मार्गातून सीईटी सेलतर्फे प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे.बीएएमएस, बीएचएमएस राज्यातील ८५ टक्के प्रवेश राज्यातील शासकीय, खासगी महाविद्यालयांतील ८५ टक्के जागांसाठी २१ ते २५ जुलै या कालावधीमध्ये पसंतीक्रम नोंदविल्यानंतर प्रवेशाची पहिली फेरी जाहीर झालेली असून, २ ऑगस्टपर्यंत प्रवेश घेण्यासाठीची मुदत आहे.

प्रवेश स्वीकारताना खालील गोष्टी लक्षात घ्याव्यात.  स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून घेणे बंधनकारक नसते.मिळालेला प्रवेश घ्यावाच लागतो, तो घेतला नाही, तर बीएएमएस, बीएचएमएसच्या या मार्गातील प्रवेश प्रक्रियेतून आपण कायमचे बाहेर फेकले जातो.  आपल्याला मिळालेला प्रवेश मनासारखा योग्य आहे, या प्रवेशाने आपण समाधानी असाल, तर तो कायमस्वरूपी निश्‍चित करण्यासाठी स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून द्यावा लागतो. तो दिल्यानंतर आपणास पुढील फेऱ्यांमध्ये भाग घेता येत नाही. म्हणजेच, आपणास बेटरमेंट पर्याय उपलब्ध होत नाही. 

 आपणास प्रवेश मिळाला, आपण फी व कागदपत्रे देऊन तो स्वीकारला,रिटेन्शन फॉर्म भरला नाही, तर आपण पुढील फेऱ्यांमध्ये बेटरमेंटसाठी पात्र असतो. बेटरमेंट मिळाली तर नवीन ठिकाणी मिळालेला प्रवेश घ्यावाच लागतो व आपला पूर्वीचा प्रवेश आपोआप रद्द होतो.  प्रवेश मिळाला, स्वीकारला, रिटेन्शन फॉर्म भरला नाही, तसेच पुढील फेरीत आपल्याला बेटरमेंट मिळाली नाही, तरीही आपला पूर्वीच्या फेरीतील प्रवेश १०० टक्के कायम राहतो.

 ‘आयुष’ प्रवेश प्रक्रिया‘आयुष’तर्फे यंदा प्रथमच देशपातळीवरील १५ टक्के ऑल इंडिया कोट्यातील शासकीय व खासगी महाविद्यालयातील जागांसाठी तसेच अभिमत विद्यापीठातील १०० टक्के जागांवरील आयुर्वेद, सिद्ध, होमिओपॅथी व युनानी शाखांमधील प्रवेशासाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत असून, प्रवेशाची दुसऱ्या फेरीसाठीची प्रवेश यादी ३१ जुलै रोजी www.aaccc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. या दुसऱ्या फेरीमध्ये ‘फ्री एक्झिट’ची सोय नाही.

 मिळालेला प्रवेश घ्यावाच लागतो, न घेतल्यास आपली अनामत रक्कम जप्त होते. प्रवेश मिळाला, स्वीकारला, फी व कागदपत्रे देऊन घेतला, तर तो प्रवेश नंतर सोडता येत नाही.  प्रवेश मिळाला, स्वीकारला, आपली अनामत रक्कम संस्थेकडे फी मध्ये वर्ग होईल. प्रवेश शेवटच्या फेरीपर्यंत मिळालाच नाही, अशावेळी अनामत रक्कम आपल्या बॅंक खात्यात जमा होते. शासकीय संस्थांमधील १५ टक्के व खासगी महाविद्यालयातील १५ टक्के कोट्यासाठी जाहीर झालेली दुसरी फेरीही अंतिम असून या फेरीनंतर नॉन जॉईनिंगमुळे शिल्लक राहिलेल्या जागा संबंधित राज्यांकडे ११ ऑगस्ट रोजी वर्ग केल्या जातील.

अभिमत विद्यापीठांतील बीएएमएस, बीएचएमएस प्रवेशासाठी तिसरी अंतिम फेरी म्हणजेच मॉप अप राऊंडसाठी २३ ते २७ ऑगस्ट या कालावधीत रजिस्ट्रेशन व पसंतीक्रम भरावयाचे आहेत. ज्यांनी यापूर्वी रजिस्ट्रेशन केलेले आहे, त्यांना नव्याने रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नसते. २९ ऑगस्ट रोजी प्रवेशाची यादी जाहीर होईल व त्यानंतर ३० ऑगस्ट ते ७ सप्टेंबरपर्यंत प्रवेश घ्यावयाचे आहेत. या मॉप अप राऊंडनंतर नॉन जॉईनिंगमुळे शिल्लक राहिलेल्या जागा संबंधित संस्थेकडे वाटपासाठी वर्ग केल्या जातात. या जागांसाठी स्ट्रे व्हॅकेन्सी राऊंड संस्थेकडून घेतला जातो. सर्वसाधारणपणे जेवढ्या जागा शिल्लक राहतात, त्याच्या १० पट विद्यार्थ्यांची यादी आयुषतर्फे संबंधित संस्थेकडे पाठवली जाते व त्यामधील मेरीट क्रमांकानुसार प्रवेश दिले जातात.  

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News