शिक्षण राहिलं बाजूला, बांबूकटाई बनतोय जिल्ह्यातील युवकांचा रोजगार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 8 July 2019
  • कामासाठी भटकंती थांबली; ग्रामसभांना मिळाले आर्थिक उत्पन्नाचे साधन

भामरागड - नक्षलग्रस्त तथा अतिदुर्गम तालुका म्हणून ओळख असलेल्या भामरागड तालुक्‍यात तेंदूपत्ता हंगामा शिवाय दुसरा रोजगार नाही. मात्र, येथील जंगलात उपलब्ध असलेल्या बांबूला बाहेर जिल्ह्यात मागणी असल्याने या कामासाठी युवकांचा वापर होत असल्याने त्यांच्या हाताला काम मिळाले आहे.

भामरागड तालुक्‍यातील चांगल्या दर्जाचा बांबू उपलब्ध असल्याने बल्लारशा येथील पेपरमिलकडून मोठ्या प्रमाणात बांबूची मागणी आहे. मध्ये काही वर्षे खरेदी प्रक्रिया थांबली  होती. त्यामुळे रोजगाराचीही समस्या निर्माण झाली होती. मात्र, आता पुन्हा बांबूची वाहतूक सुरू झाल्याने अनेक गावांतील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. चांगल्या दर्जाचा बांबू अतिदुर्गम बिनागुंडा, कुवाकोळी, गुंडुरवाही फुलनार, कोहपर्शी, पुयुरकोठी व तुम्हरकोठी या जंगलात मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. 

यंदा ग्रामसभेच्या माध्यमातून बांबूची थेट विक्री बल्लारशा येथील पेपर मिलला केली जात आहे. सध्या ठिकठिकाणी तोडलेले बांबू मुख्य मार्गावर आरेवाडा या गावालगत डेपो तयार करून साठवला जात आहे. मजुरांच्या मदतीने या बांबूचे योग्यप्रकारे बंडल बनवून ते ट्रकमध्ये भरून बल्लारशा येथे पाठविण्यात येत आहे. या कामासाठी बेरोजगार युवकांना संधी दिली जात  असल्याने युवकांची कामासाठी भटकंती थांबली असून रोजगाराचाही प्रश्न सुटला आहे. यासाठी भामरागड पंचायत समितीचे सभापती सुखराम मडावी यांनीही पुढाकार घेतला आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News