राजकारणातील शब्दावरचा विश्‍वास उडाला  जे ठरले होते ते झालेच नसल्याचा बाळासाहेब शेळकेंचा आरोप 

प्रमोद बोडके
Monday, 10 June 2019
  • सोलापूर कॉंग्रेसमध्ये आणखी एक मोठा धक्का

सोलापूर : राजकारणात दिलेले शब्द पाळले जात नाहीत याचा अनुभव मला आज आला आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती निवडीबाबत जे ठरले होते ते झाले नाही. बाजार समितीत आम्ही मिळून आहोत परंतु कार्यकर्त्यांच्या भावना विचारात घेऊन दक्षिण सोलापूर तालुक्‍याच्या हिताचा निर्णय पुढील काळात घेऊ अशी माहिती बाजार समितीचे संचालक बाळासाहेब शेळके यांनी दिली. 

कॉंग्रेसचे वर्चस्व राहिलेल्या सोलापूर बाजार समितीवर आज पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांची सभापती म्हणून बिनविरोध निवड झाली. कॉंग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. या पदासाठी कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके इच्छुक होते.

शेळके यांच्या ऐवजी पालकमंत्री देशमुख यांना आयत्या वेळी संधी संधी मिळाल्याने सोलापूर कॉंग्रेसमध्ये आणखी एक मोठा धक्का बसला आहे. सोलापूर लोकसभा मतदार संघातून सुशीलकुमार शिंदे यांचा दारुण पराभव झाल्यानंतर आता विधानसभेच्या तोंडावर कॉंग्रेसमधील दुफळी आणखी वाढल्याची चिन्हे दिसत आहेत. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News