खेलरत्न पुरस्कारासाठी बजरंगची शिफारस

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 17 August 2019

देशातील या सर्वोत्तम पुरस्कारासाठी आवश्‍यक असलेले सर्व यश मिळवले आहे. हा पुरस्कार योग्य व्यक्तीला मिळायला हवा, असे मी नेहमीच म्हणत आलो आहे.

- बजरंग पुनिया (सध्या जॉर्जीया येथे प्रशिक्षण घेत आहे)

नवी दिल्ली : आशियाई आणि राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता मल्ल बजरंग पुनियाची खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.

बायचुंग भुतिया आणि मेरी कोम सदस्य असलेल्या १२ जणांच्या समितीने दोन दिवस खल केल्यानंतर बजरंगचे नाव निश्‍चित केले.

बजरंगबरोबर आणखी एका खेळाडूचे नाव या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी शिफारस केले जाऊ शकते. ही निवड समिती अर्जुन आणि द्रोणाचार्य पुरस्कारांचीही नावे सूचवणार आहे.

जकार्ता येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत ६५ किलो गटात बजरंगने सुवर्णपदक मिळवले होते. त्यासह गोल्ड कोस्ट येथील राष्ट्रकुल स्पर्धेतही त्याने सुवर्ण भरारी घेतली होती.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News