पुरुषांत ‘बाहेती’ तर महिला गटात ‘मू. जे.’ विद्यालयाला विजेतेपद

सकाळ वृतसेवा (यिनबझ)
Thursday, 17 October 2019
  • जळगावमध्ये आंतरमहाविद्यालयीन कबड्डी स्पर्धा; विजयी संघांना पारितोषिक वितरण

जळगाव - ॲड. बाहेती महाविद्यालयाच्या प्रांगणात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठांतर्गत आंतरमहाविद्यालयीन पुरुष व महिलांच्या कबड्डी स्पर्धा झाल्या. यात पुरुष गटात बाहेती महाविद्यालय, तर महिला गटात मू. जे. महाविद्यालयाच्या संघाने विजेतेपद पटकाविले. बाहेती महाविद्यालयात १३ व १४ ऑक्‍टोबरला स्पर्धा झाल्या. स्पर्धेत पुरुष गटात १६, तर महिलांच्या दहा संघांनी सहभाग नोंदविला होता. यात पुरुषांच्या गटात बाहेती महाविद्यालयाने मू. जे. महाविद्यालयाचा ४१-१६ असा २५ गुणांच्या फरकाने एकतर्फी विजय मिळविला; तर महिला गटात मू. जे. महाविद्यालयाने भुसावळच्या नाहाटा महाविद्यालयावर ४२-२२ अशा वीस गुणांच्या फरकाने विजय मिळविला. 

तृतीय स्थानासाठी पुरुष गटात नाहाटा महाविद्यालयाने वरणगाव महाविद्यालयावर ४०-३९ असा निसटता विजय मिळविला; तर महिला गटातून भुसावळच्या कोटेचा महिला महाविद्यालयाने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयावर ३०-१० असा एकतर्फी विजय मिळविला. स्पर्धेतील विजयी संघांना क्रीडा रसिक एज्युकेशन सोसायटीचे सचिव रोहन बाहेती व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल लोहार यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. याप्रसंगी प्रा. हरीश शेळके, डॉ. पी. आर. चौधरी, प्रा. यशवंत देसले, प्रा. आनंद उपाध्ये, डॉ. संजय चौधरी, प्रा. किरण नेहेते, प्रा. नितीन चौधरी आदी उपस्थित होते. पंच म्हणून सुनील राणे, आनंद महांगडे, हितेश सोनी, अनिल कोळी, चैत्राम पवार, कमलेश पाटील, अलेक्‍झांडर मणी, नयनसागर मणी, सुरेश महाजन यांनी काम पाहिले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News