#badget २०१९ : सोन्याचे भाव गडाडणार; पाहा किती होणार वाढ   

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 5 July 2019

मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून सोन्याच्या किमतींमध्ये चढ उत्तर होत असल्याचे पाहायला मिळत आहे. आज अर्थसंकल्प सादर करताना अनेक गोष्टी महाग झाल्याचे पहायला मिळाले आहे. सोने देखील पुन्हा एकदा उच्चांक गाठणार आहे. 

याचं कारण असं की, सोनं आणि मौल्यवान धातूवरील कस्टम ड्युटीमध्ये वाढ करण्यात आली आहे. सोन्यावरील कस्टम ड्युटी १० वरून १२.५ टक्के करण्यात आली आहे. सोने-चांदीचे शुल्क वाढवण्यात आले असून १० टक्क्याऐवजी ते आता १२.५ टक्के इतके करण्यात आले आहे. त्यामुळे सोने-चांदीच्या वस्तू महागणार आहे. 

याचा फटका सामान्य नागरिकांना बसणार असल्याचे दिसून येत आहे. मोदी सरकारच्या अर्थसंकल्पात अनेक गोष्टी महागल्याने दिसत आहे. 

लग्न करणाऱ्यांना महागाईची झळ  :
सोन्याच्या दरवाढीमुळे लग्न करणाऱ्यांना वधू-वरांना याची झळ बसणार आहे. लग्नामध्ये सोन्याला मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्यामुळे वधू आणि वर पक्षाला महागाईचा सामना करावा लागणार आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News