बाबरी मस्जिद प्रकरण: या कारणामुळे बाळासाहेबांवर झाला गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 9 November 2019
  • 1992-93 मध्ये आयोध्येत बाबरी मस्जिद पाडण्यात आली होती. त्याचे पडसाद मुंबईत जाणवले. मुंबईत मोठी दंगल घडली होती.
  • हिंदूह्रद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

मुंबई: 1992-93 मध्ये आयोध्येत बाबरी मस्जिद पाडण्यात आली होती. त्याचे पडसाद मुंबईत जाणवले. मुंबईत मोठी दंगल घडली होती. त्यानंतर मुंबईत बॉम्बस्फोट झाले होते. या संपुर्ण दंगलीविषयी सामना वृत्तपत्रात संपादकीय लेख छापुन आले होते. या लेखांचा आधार घेऊन हिंदूह्रद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

बाळासाहेबांना अटक होणार अशी अफवा पसरल्यामुळे संपुर्ण मुंबई शहर धगधगत होतं. तर तरुणांना महाविद्यालये सोडावी लागली होती. ही परिस्थिती पाहून बाळासाहेब स्वत:च कोर्टात हजर झाले होते. त्यांनतर कोर्टाने सांगितले की, हा गुन्हा होऊ शकत नाही. 'बाळासाहेबांवर सु़डबुद्धीने ही कार्यवाही केली होती' असे मत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एका कार्यक्रमात व्यक्त केले होते. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News