बीएच्‍या विद्यार्थ्यांना भोपळा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 18 July 2019
  • पुनर्मूल्यांकनाचे शुल्क न घेण्याची ‘आयडॉल’च्‍या विद्यार्थ्यांची मागणी
  • आयडॉलने एप्रिल-मे महिन्यात घेतलेल्या प्रथम वर्ष बीए परीक्षेसाठी ७ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी ५ हजार ९० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. ​

मुंबई - मुंबई विद्यापीठाच्या ‘आयडॉल’मार्फत घेण्यात आलेल्या प्रथम वर्ष बीए परीक्षेचा निकाल मंगळवारी (ता.१६) जाहीर करण्यात आला. या परीक्षेत तब्बल २३६ विद्यार्थ्यांना शून्य गुण मिळाले. यामुळे नापास झालेले विद्यार्थी संतप्त झाले असून पेपर पुनर्मूल्यांकनाचे शुल्क न घेण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. 

आयडॉलने एप्रिल-मे महिन्यात घेतलेल्या प्रथम वर्ष बीए परीक्षेसाठी ७ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी ५ हजार ९० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. या परीक्षेचा निकाल ४३ टक्के लागला आहे; परंतु या परीक्षेत तब्बल २३६ विद्यार्थ्यांना शून्य गुण मिळाले आहेत. इंग्रजीसह इतर विषयांमध्ये विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत; मात्र एका विषयात एवढ्या मोठ्या संख्येत विद्यार्थ्यांना शून्य गुण मिळाल्याने आयडॉलच्या कारभारावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे

८० गुणांचा पेपर सोडविल्यानंतरही मला त्या विषयात शून्य गुण मिळतात, हे अशक्‍य असल्याचे ऋतिक डोईफोडे या विद्यार्थ्याने सांगितले. आयडॉलच्या पेपर तपासणीचा फटका आम्हाला बसला असून पुनर्मूल्यांकनासाठी आम्ही भुर्दंड का सहन करायचा, असा सवालही त्यांनी व्यक्त केला. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News