आयुष्मानसोबत भूमी पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 5 June 2019

‘टॉयलेट एक प्रेमकथा’, ‘शुभमंगल सावधान’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांत अभिनेत्री भूमी पेडणेकरने काम केले. अगदी कमी वेळातच प्रेक्षकांनी तिला आपलेसे केले.

‘टॉयलेट एक प्रेमकथा’, ‘शुभमंगल सावधान’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांत अभिनेत्री भूमी पेडणेकरने काम केले. अगदी कमी वेळातच प्रेक्षकांनी तिला आपलेसे केले.

आता येत्या वर्षात तिचे जवळपास चार चित्रपट बॉक्‍स ऑफिसवर दाखल होणार आहेत. विशेष म्हणजे भूमी बॉलीवूडमधील महत्त्वाच्या कलाकारांबरोबर काम करताना दिसणार आहे. आयुष्मान खुराणा, विकी कौशल, कार्तिक आर्यन यांच्याबरोबर ती रुपेरी पडद्यावर दिसणार आहे.

‘बाला’ चित्रपटात भूमी आयुष्मानबरोबर काम करताना दिसेल. आयुष्मान-भूमीचा हा तिसरा एकत्रित चित्रपट असणार आहे. शिवाय विकी, कार्तिक या दोन्ही कलाकारांबरोबर ती पहिल्यांदाच काम करतेय.

भूमी म्हणते, ‘मला सध्या माझ्या मनासारखं काम करायला मिळत आहे. शिवाय बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध कलाकारांबरोबर मी आता रुपेरी पडद्यावर दिसणार आहे.’ एकूणच काय तर येत्या काही  दिवसांत भूमीचे चित्रपट बॉक्‍स ऑफिसवर गर्दी करणार आहेत. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News