'थिएटर ऑफ रेलेवन्स'चे युवा कलाकार सादर करणार "पर्यावरण" संवर्धनाची जाणीव

अश्विनी नांदेडकर ( रंगकर्मी )
Saturday, 31 August 2019

निळाशार रंगाची, अदभुत अशी आपली धरती, आपली वसुंधरा... पंचतत्वाने निर्माण झालेली आणि आता तिचे विक्राळ स्वरूप आपल्या समोर येत आहे. या दोन टोकांच्या तिच्या प्रवासामध्ये मानव कुठे आहे. या तिच्या प्रवासात मानवाची काय भूमिका आहे. 

आपण दर महिन्याला किंवा दर पंधरा दिवसांनी नैसर्गिक आपत्तीच्या बातम्या ऐकतो. त्यांचे स्वरूप, परिणाम त्यांने झालेली हानी पाहून आपल्या जीवाचा थरकाप होतो. पूर, त्सुनामी, भूकंप, वादळ या सगळ्यांना नैसर्गिक आपत्ती म्हणतो पण आता या नैसर्गिक पेक्षा मानव निर्मित आपत्ती जास्त वाटतात. 

निळाशार रंगाची, अदभुत अशी आपली धरती, आपली वसुंधरा... पंचतत्वाने निर्माण झालेली आणि आता तिचे विक्राळ स्वरूप आपल्या समोर येत आहे. या दोन टोकांच्या तिच्या प्रवासामध्ये मानव कुठे आहे. या तिच्या प्रवासात मानवाची काय भूमिका आहे. 

आपण दर महिन्याला किंवा दर पंधरा दिवसांनी नैसर्गिक आपत्तीच्या बातम्या ऐकतो. त्यांचे स्वरूप, परिणाम त्यांने झालेली हानी पाहून आपल्या जीवाचा थरकाप होतो. पूर, त्सुनामी, भूकंप, वादळ या सगळ्यांना नैसर्गिक आपत्ती म्हणतो पण आता या नैसर्गिक पेक्षा मानव निर्मित आपत्ती जास्त वाटतात. 

सगळ्यांत बुद्धिमान असलेला मानव इतका मूर्ख निघावा. स्वतः सह संपूर्ण मानवजातीचा ऱ्हास करायला निघाला. 
आपण नैसर्गिक आपत्ती आल्यावर या मानसिकतेत अडकलो आहोत की, हे नैसर्गिक आहे निसर्गाचा प्रकोप आहे. निसर्गापुढे आपण काही करू शकत नाही. कोणाच्याही मनात हे येत नाही की, आपणच निर्माण केलेली परिस्थिती आहे. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी आपल्यालाच मार्ग शोधावा लागणार. 

भौतिक विकासासाठी निकृष्टतेने आपण जंगलांचे आणि खनिज संपत्तीचे शोषण केले आहे. जलदगतीने जंगले तोडल्यामुळे, अगदी खोल वनक्षेत्रही ओसाड झाली आहेत. त्यामुळे वन्यजीव नष्ट होत आहेत. साधा आपला श्वास कोंडला तर काय होईल?  आपण इतकी वर्षे प्लास्टिक, रासायनिक खते, कारखान्यांचे सांडपाणी हे सगळं सोडून पृथ्वीचा श्वास कोंडतो आहोतच. 

स्वतःची गरज पूर्ण करण्यासाठी आपण निसर्गाकडून किती घ्यायला हवे आणि पृथ्वीच्या भविष्यासाठी किती सोडून द्यायला हवे, या दोघांमध्ये संतुलन असणे आवश्यक आहे! आज हे स्पष्ट होत चालले आहे की आपण विकासाच्या जोरावर पर्यावरणाचे संरक्षण नाही करू शकत आणि पर्यावरणाच्या संरक्षणा शिवाय आपण स्थायी विकास ही नाही करू शकत! 

नेमका कुठला विकास अपेक्षित आहे? एसीची कृत्रिम हवा काही क्षणातच वातावरण थंड करते, परंतु त्यातून बाहेर येणारे कार्बन हे पृथ्वीच्या बाहेरील ओझोन थराचा छेदणारे दीर्घकालीन घटक आहे याची आपल्याला जाणीव आहे का? प्रत्येक गोष्ट झटपट मिळायला हवी, तसाच आपला प्रवास ही वेगवान होण्यासाठी आपण मोठमोठ्या गाड्या विकत घेतल्या, हायवे, फ्लायओव्हर बांधले, पण याने खरच आपला प्रवास सोयीस्कर झाला का? ट्रॅफिक मध्ये एक इंच पुढे सरकता येत नसल्यामुळे चालकाचे वाढणारे बी.पी, राग, वैताग हे योग्य आहे का! पुर आला म्हणून आपणच आपल्या गाडीत स्वतःचा जीव कोंडून घेतला, हा नेमका कुठला विकास? 

पाणी साचवण्यासाठी मोठमोठी धरणं बांधली पण त्यात संपूर्ण गाव वाहून जाण्याची बातमी कानावर येते त्याचं काय? प्रत्येक कृतीची प्रतिक्रिया असतेच. बी लावले की रोप उगते. बाष्प निर्माण झाले की त्यानंतर तो थंड होऊन पाऊस पडतो. तसेच आपण जंगलतोड केली, नैसर्गिक संसाधने वापरली, डोंगर सपाट केले तर त्याची प्रतिक्रिया काय होणार याचा विचार केला का? 

मान्य आपण काळानुसार बदलायला हवे, नवीन आविष्कार ही घडवायला आणि स्वीकारायला हवे. परंतु, असे आविष्कार नकोत जे विकासाच्या नावावर मानवाचे कल्याण करण्याऐवजी मानवजातीला आणि संपूर्ण माय भूमीला घातक ठरतील. विचार करूया आणि विकासाचा अर्थ समजून घेऊया! संतुलन, स्वीकार्यता आणि सामूहिक जीवन शैलीच आपले संवर्धन करू शकते! 

Yinbuzz 'यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क बझ’ पोर्टलने तरुणांमध्ये सामाजिक बांधिलकी निर्माण करण्यासाठी व अभिव्यक्तीसाठी वैचारिक मंच उपलब्ध करून दिला आहे. याच उद्देशाने Yinbuzz पोर्टलने पर्यावरण संवर्धनाच्या हितार्थ "थिएटर ऑफ रेलेवन्स" च्या प्रतिबद्ध युवा कलाकारांसोबत हा पुढाकार घेतला आहे. 

28 व्या वर्षातील पदार्पणाचा नवीन संकल्प घेऊन "थिएटर ऑफ रेलेवन्स" अभ्यासक आणि रंगकर्मी, Yinbuzz च्या माध्यमातून प्रत्येक जनमानसात निसर्गाला जपण्याची आणि त्याच्या संवर्धनाची जाणीव निर्माण होण्यासाठी यावर्षी गणेशोत्सवाच्या रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिखित - दिग्दर्शित नाटक "पर्यावरण" सादर करणार आहेत!

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News