उभे राहून जेवण करणे टाळा; नाहीतर होईल रोगांचा सापळा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 10 October 2019

धावपळीच्या प्रत्येकाला खाली जमिनीवर बसून पंगतीत जेवण्यासाठी वेळ नसल्याने आजकाल उभे राहून जेवण्याची पद्धत सुरु झाली आहे. त्याला 'बुफे' असे नाव देण्यात आले आहे.

पूर्वी जेवताना सगळेजण जमिनीवर बसून जेवण करायचे त्याच्या मागे एक शास्त्र आहे कारण आहे. जेवताना खाली बसून शांतपणे प्रत्येक घास हा ३२ वेळा चावून खाल्ला जात असे. खाली जमिनीवर बसून जेवण्याची पद्धत ही आदर्श पद्धत मानली जाते. 

काळ बदलत गेला तस वागण्याची पद्धत आणि राहणीमान बदलत गेले. त्यानुसार, लोकांची सॅन समारंभात जेवण्याची पद्धत बदलत गेली. आजकाल उभ्याने जेवण्याची पद्धत रूढ झाली आहे. धावपळीच्या प्रत्येकाला खाली जमिनीवर बसून पंगतीत जेवण्यासाठी वेळ नसल्याने आजकाल उभे राहून जेवण्याची पद्धत सुरु झाली आहे. त्याला 'बुफे' असे नाव देण्यात आले आहे. याच बुफेने म्हणजे उभ्याने जेवण केल्याने शरीराला कोणत्या प्रकारची हानी होऊ शकते हे जाणून घेणे महत्वाचे आहे.

जेवण घेण्यासाठी सारखे-सारखे रांगेत उभे राहावे लागते. वारंवार रांगेत उभे राहून जेवण वाढून घ्या. ऐवजी एकदाच ताटात घेऊन जेवणे लोक पसंत करतात. मात्र उभ्यानें जेवण केल्याने अपचन, लठ्ठपणा आणि ऍसिडिटी होण्याची शक्यता जास्त असते. शरीरातील आतड्या आकसल्या जातात आणि त्यामुळे खाल्लेले पचायला जड जाते. उभे राहून जेवताना पायात बूट चप्पल असते ज्याने आपले पाय गरम पडतात जे आपल्या शरीरासाठी योग्य नाही असे आयुर्वेदात सांगितले आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News