औरंगाबादचे गरवारे स्टेडियम झाले चकाचक

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 17 June 2019

महापालिकेच्या गरवारे स्टेडियमकडे महापालिकेच्या यंत्रणेचे नेहमीच दुर्लक्ष होते.

औरंगाबाद - महापालिकेच्या गरवारे स्टेडियमकडे महापालिकेच्या यंत्रणेचे नेहमीच दुर्लक्ष होते. गेल्या अनेक दिवसांपासून स्टेडियमवर मोठ्या प्रमाणावर कचरा जमा झाला होता. अखेर येथे मॉर्निंग वॉकला येणाऱ्या नागरिकांनीच पुढाकार घेऊन रविवारी (ता.१६) मैदान चकाचक केले. 

महापालिकेच्या गरवारे स्टेडियमवर शहराच्या कान्याकोपऱ्यातून खेळाडू सरावासाठी येतात. त्याचप्रमाणे विविध ठिकाणांहून नागरिक मॉर्निंग वॉकसाठी येत असतात. गरवारे स्टेडियमकडे महापालिका यंत्रणेचे नेहमीच दुर्लक्ष आहे. मैदानाची आणि परिसराची नियमित साफसफाई केली जात नाही. उलट जवळच महापालिकेने कचरा डंपिंग सुरू केले. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर कचरा साचला होता. दिवसेंदिवस कचरा वाढत असल्याने मैदानावर येणारे नागरिक अस्वस्थ झाले होते. म्हणून महापालिकेवर विसंबून राहण्याऐवजी आपणच श्रमदान करून मैदान चकाचक करू, असा निर्णय नागरिकांनी घेतला.

त्यानुसार रविवारी सकाळी सहापासून येथे खेळण्यासाठी येणारे आणि फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी सहभाग घेऊन मैदान चकाचक केले. यामध्ये महापालिकेचे व्यवस्थापक दत्ता सरोदे, राजेंद्रसिंग रंधवा, बसवराज जिबकाटे, माधव वीर, तुषार बागूल, रौनक मेहता, अण्णासाहेब डांगे, प्रशांत सबनीस, स्वप्नील चव्हाण, अनिल माशाळकर, गणेश वडकर यांच्यासह इतरांनी सहभाग घेतला.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News