‘सत्ते पे सत्ता’ नव्यारुपाने प्रेक्षकांच्या भेटीला

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 8 June 2019

'सत्ते पे सत्ता’ चित्रपटाचा रिमेक. अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनी यांचा ‘सत्ते पे सत्ता’ चित्रपट सुपरहिट ठरला होता.

येत्या वर्षात अभिनेता हृतिक रोशनचे दोन ते तीन हिंदी चित्रपट बॉक्‍स ऑफिसवर दाखल होणार आहेत. त्यातीलच एक चित्रपट म्हणजे ‘सत्ते पे सत्ता’ चित्रपटाचा रिमेक. अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनी यांचा ‘सत्ते पे सत्ता’ चित्रपट सुपरहिट ठरला होता.

आता या चित्रपटाच्या रिमेकमध्ये अमिताभ यांची भूमिका हृतिक साकारणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फराह खान आणि रोहित शेट्टी मिळून हा चित्रपट बनवत आहेत.

फराहने हृतिकला या चित्रपटासाठी विचारले असता त्याने ‘सत्ते पे सत्ता’च्या रिमेकला होकार दिला आहे. सध्या फराह या चित्रपटाच्या कथेवर काम करत आहे.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News