कुठलाही सिनेमा चालवण्यासाठी कथा ही सर्वात महत्त्वाची

प्रशांत कांबळे
Saturday, 20 July 2019

बॉलीवूडमधले तीन हुकमी एक्के म्हणजे शाहरूख, आमीर आणि सलमान खान. त्यांचा चित्रपट म्हटला की हमखास यश.   ‘हंड्रेड करोड क्‍लब’ ही प्रथा आधी याच खानांमुळे आली. निर्मात्यांमध्ये ही एक व्याख्या बनली होती, की जर तुम्हाला हंड्रेड करोड कमावयाचे असेल तर तुम्हाला मोठ्या स्टारशिवाय पर्याय नाही. पण गेल्या काही महिन्यांमध्ये ही व्याख्या बदलताना दिसत आहे. याचे कारण म्हणजे मागच्या वर्षी तिन्ही खानचे सिनेमे हे अक्षरशः फ्लॉप गेले. शाहरुखचा ‘झिरो’, सलमानचा ‘ट्यूबलाईट’ आणि आमिरचा ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ हे तिन्ही खानांचे चित्रपट अक्षरशः भुईसपाट झाले. कारण प्रेक्षकांनी हे दाखवून दिले, की कुठलाही सिनेमा चालवण्यासाठी त्यातली कथा ही सर्वात महत्त्वाची आहे. 

मुंबई :  बॉलीवूडमधले तीन हुकमी एक्के म्हणजे शाहरूख, आमीर आणि सलमान खान. त्यांचा चित्रपट म्हटला की हमखास यश. निर्मात्यांना त्यांनी घसघशीत कमाई करून दिली व आपला स्वतंत्र फॅन क्‍लब स्थापित केला. काही वर्षांपूर्वी सिनेमा फक्त यांच्या नावावर खपला जाई. मग त्या सिनेमामध्ये कथा ही दुसऱ्या क्रमांकाचे प्राधान्य मिळवू लागली. ‘हंड्रेड करोड क्‍लब’ ही प्रथा आधी याच खानांमुळे आली. निर्मात्यांमध्ये ही एक व्याख्या बनली होती, की जर तुम्हाला हंड्रेड करोड कमावयाचे असेल तर तुम्हाला मोठ्या स्टारशिवाय पर्याय नाही. पण गेल्या काही महिन्यांमध्ये ही व्याख्या बदलताना दिसत आहे. याचे कारण म्हणजे मागच्या वर्षी तिन्ही खानचे सिनेमे हे अक्षरशः फ्लॉप गेले. शाहरुखचा ‘झिरो’, सलमानचा ‘ट्यूबलाईट’ आणि आमिरचा ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ हे तिन्ही खानांचे चित्रपट अक्षरशः भुईसपाट झाले. कारण प्रेक्षकांनी हे दाखवून दिले, की कुठलाही सिनेमा चालवण्यासाठी त्यातली कथा ही सर्वात महत्त्वाची आहे. 

आता नेटफ्लिक्‍स, ॲमेझॉन प्राईम यासारखे ॲप लोकांच्या हातात आहेत. त्यामुळे जागतिक सिनेमा त्यांच्या आवाक्‍यात आला आहे. आधी कुठलाही जागतिक सिनेमा (हॉलीवूड सोडून) बघायचा असल्यास फिल्म फेस्टिवल गाठायला लागत असे. पण आता थेट तुमच्या मोबाईलमध्ये ही सेवा पुरवली जाऊ लागली आहे. त्यामुळे लोकांच्या विचारांमध्ये कमालीचा बदल होऊ लागला आहे. त्यांना वास्तववादी गोष्टी कशा दाखवल्या जातात हे अधिक स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे इथे आपोआप एक प्रकारची तुलना होऊ लागली आणि त्याचा फटका या मोठ्या स्टार्सना बसला आणि त्याचा फायदा झाला छोट्या निर्मात्यांना, ज्यांना एखादी चांगली कथा प्रामाणिकपणे मांडता येऊ लागली. आता कथेचे स्वरूप बदललं आहे. 

आधी सगळ्या कथा या मोठ्या शहरात किंवा देशाबाहेर घडताना दिसत होत्या; पण आता या छोट्या गावांमधल्या, छोट्या शहरांमधल्या कथा समोर येऊ लागल्या. या कथेला अनुसरून कलाकारांची निवड होऊ लागली. तेथील संस्कृती आणि परंपरा लोकांना आवडू लागली, साहजिकच यामुळेच राजकुमार राव, विकी कौशल, आयुष्मान खुराणा यांसारखे कलाकार ज्यांना मोठ्या स्टार मंडळींसारखी स्टार व्हॅल्यू नाही; ते अचानक प्रकाशझोतात आले आणि बॉलीवूडमधली मानाची जागा मिळवू लागले. हा सगळा बदल अलीकडच्या चित्रपटामुळे घडलेला आहे. 

यामध्ये मोलाचा वाटा उचलला तो लेखकांनी. भारताचे एक वास्तववादी रूप त्यांनी लोकांसमोर आणण्याचा सपाटा लावला आहे. लोकांच्या दैनंदिन जीवनातील समस्या आणि त्यांचे प्रश्‍न मांडण्याचा प्रयत्न ते करीत आहेत. अशा सिनेमांना प्रेक्षकही चांगली पसंती देत आहेत. मागच्या महिन्यात आयुष्यमान (मागचे सलग ५ सिनेमे हिट दिले आहेत)चा आर्टिकल १५ (लो बजेट) सारखा सिनेमा जेव्हा येतो आणि भारतातील जातीय व्यवस्थेचे एक क्रूर रूप दाखवतो. भारताच्या संविधानात असलेली समानतेची व्याख्या आपण मानत नाही हे अगदी ठामपणे या सिनेमात सांगतो. शाहिद कपूरचा आलेला कबीर सिंग हा सिनेमा वैयक्तिकतावर भाष्य करतो व तो आपला मुद्दा अगदी रुद्र पद्धतीने मांडतो. आता या अशा सिनेमाने एक गोष्ट दाखवून दिली, की हंड्रेड करोड कमावण्यासाठी कुठल्याही मोठ्या स्टारची गरज नाही. यामुळे असं घडलं, की मोठ्या स्टार मंडळींना समजलं आपणही अशा कथेला प्राधान्य दिले पाहिजे; नाही तर आपला टिकाव लागणे कठीण आहे.

नुकताच प्रदर्शित झालेला हृतिकचा ‘सुपर ३०’ हा त्याचे चांगले उदाहरण आहे. भारतात जातीय व्यवस्थेनंतर जर काही भयानक असेल ते म्हणजे आर्थिक विषमता. समानतेचा जसा अधिकार आहे, तसा सगळ्यांना शिक्षण घेण्याचाही अधिकार आहे. ही गोष्ट या सिनेमामध्ये जरा फिल्मी स्टाईलने पण प्रभावी पद्धतीने मांडली आहे. हृतिकची डान्स हिरो, ॲक्‍शन हिरो अशी असलेली प्रतिमा या सिनेमामध्ये पूर्णपणे बदललेली दिसत आहे. कमालीची गोष्ट म्हणजे लोक याला स्वीकारत आहेत. यामध्ये काही प्रमाणात का होईना पण याचे श्रेय रिजनल (प्रादेशिक ) सिनेमाला जाते. कारण प्रादेशिक सिनेमात कथा ही फार महत्त्वाची मानली जाते. लोक तिकडे आकर्षित होत आहेत. हे आता हिंदी चित्रपट निर्माते, लेखक व दिग्दर्शक यांना कळले आहे आणि त्यामुळेच आता त्यांचा फोकस बदलला आहे.     

भारतीय चित्रपटसृष्टीत गेल्या १०० वर्षांत चांगले वाईट असे दोन्ही बदल होत गेले. आपले सिनेमे देशाबाहेर खूप मोठ्या प्रमाणात जाऊ लागले, जगभरात ओळख मिळवू लागले. छोट्या गावातून येणाऱ्या या कथा भारताची एक दुसरी बाजू दाखवत आहे आणि हाही एक सिनेमातला बदलाचा काळ आहे. हा बदल होण्याची गरज फार आधीपासून भारताला हवी होती. पण आता हा बदल होत आहे आणि आपण त्याला स्वीकारत आहोत; यामुळे भारतीय सिनेमा आणि भारतीय समाज या दोन्हीमध्ये हा मोलाचा वाटा ठरणार आहे, एवढे निश्‍चित. हा बदल नक्कीच अभिमानास्पद आहे.

प्रादेशिक सिनेमाच्या धाटणीचा जर विचार केला, की असं समजतं त्यांच्या सिनेमात कथा ही ‘हिरो’ असते. यावरूनच त्या सिनेमांना मिळणारा लोकांचा प्रतिसाद लक्षात घेता बॉलीवूड सतर्क झाले आहे. ते मसालापट, प्रेमपट अशा कथा सोडून आशयघन स्वरूपाच्या सिनेमाकडे आपले लक्ष केंद्रित करत आहे. उदाहरणार्थ देशभक्तीपर कथा किंवा बायोपिक अशा कथा निवडून चांगल्या दर्जाचे चित्रपट निर्मिती करत आहे. नुकताच आलेला ‘उरी’ किंवा ‘केसरी’ हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. बॉलीवूडसमोर आता नेटफ्लिक्‍स, ॲमेझॉन प्राईमसारखे ॲपचे आव्हान आहे. त्यामुळे त्यांची जबाबदारी वाढली आहे आणि ते ती पेलण्यात यशस्वीही होत आहे हे नक्कीच कौतुकास्पद आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News