अतुल ‘भागो मोहन प्यारे’मध्ये झळकणार 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 22 July 2019

नाटक, मालिका, चित्रपटांमधील अनुभवी कलाकार म्हणजे अभिनेता अतुल परचुरे. माध्यम कोणतेही असो, अतुल तितकाच जीव ओतून काम करतो. त्याची ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘जागो मोहन प्यारे’ ही मालिका तर प्रचंड गाजली.

आता पुन्हा एकदा तो मालिकांकडे वळला आहे. ‘झी मराठी’ वाहिनी ‘भागो मोहन प्यारे’ ही नवी मालिका घेऊन येत आहे. या मालिकेमध्ये अतुल मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

मात्र, या मालिकेचा ‘जागो मोहन प्यारे’ मालिकेशी काहीही संबंध नसेल. ‘भागो मोहन प्यारे’ची कथा पूर्णपणे वेगळी आहे. यामध्ये अतुल शिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. या मालिकेमधील इतर कलाकारांची नावे सध्या तरी गुलदस्त्यातच ठेवण्यात आली आहेत. 
 
Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News