जिल्ह्यात सहा ही विधानसभा महायुतीच्या ताब्यात द्या : अश्वजीत गायकवाड
निलंगा - विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना-रिपाइं-रासप-रयत क्रांती सेना-शिवसंग्राम महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारानिमित्त जिल्ह्यातील सहा ही विधानसभा मतदार संघात भाजपचे युवा नेते अश्वजीत अनिलकुमार गायकवाड यांनी निलंगा विधानसभा मतदार संघातील जाजनुर, जमागा, अनसरवाडा, बेंडगा या गावांना भेटी देऊन महायुतीच्या उमेदवाराना विजयी करण्याचे आवाहन केले.

या वेळी बोलताना गायकवाड म्हणाले की, देशात महायुतीची सत्ता आहे राज्यात ही सरकार आपलेच येणार आहे म्हणून गल्ली ते दिल्ली आपलीच माणसं निवडून देवून आपल्या गावाचा परिसराचा विकास करण्यासाठी संभाजी पाटील-निलंगेकर यांना लाखाच्या मतांनी विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले.
अश्वजीत अनिलकुमार गायकवाड सध्या निलंगा विधानसभा मतदार संघात गावभेटी देत असून युवकांसह मतदारांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. यावेळी पुढे बोलताना गायकवाड म्हणाले की, मजुरांच्या हाताला काम मिळावे यासाठी मजूर नोंदणीच्या माध्यमातून अनेकांना आर्थिक मदत केली. तरुणांच्या हाताला काम मिळावे यासाठी लातूर येथे रेल्वे बोगी कारखाना आणला, तसेच तालुक्यात मोठ्या प्रमाणात महामार्गाचे काम चालू आहे, जलयुक्त शिवारच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना पाण्याचा प्रश्न, प्रत्येक घरात उज्ज्वला गॅस, धूर मुक्त गाव, पाणंद रस्ते अशा विविध योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचवली आहे, यापुढील काळातही आपल्या गावाचा विकास करण्यासाठी संभाजी पाटील-निलंगेकरांना संधी द्यावी आणि देशाचे सक्षम पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हात बळकट करून देशाच्या विकासात योगदान द्यावे, अशी विनंती अश्वजीत गायकवाड यांनी केली. यावेळी विठ्ठल सोनकांबळे, कालिदास कांबळे, काशिनाथ गोमसाळे, दयानंद गायकवाड, सचिन गायकवाड, राहुल मोरे, रामलिंग पटसाळगे, दत्तात्रय सूर्यवंशी, अरविंद पाटील आदी उपस्थित होते.