लोकसंख्या नियंत्रणासाठी आसाम सरकारचा मोठा निर्णय

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 22 October 2019
  • एका जोडप्यास दोनपेक्षा अधिक मुलं असली तर, संबंधित व्यक्तीला यापुढे सरकारी नोकरी मिळणार नाही, असा निर्णय घेतला आहे.

गुवाहटी- गेल्या तीन दशकांपासून लोकसंख्या मोठ्याप्रमाणात वाढत चालली आहे. याच वाढत्या लोकसंख्येवर आळा बसविण्यासाठी आसाममधील सर्बानंद सोनोवाल सरकारनं एक निर्णय घेतला आहे.

या निर्णयामध्ये एका जोडप्यास दोनपेक्षा अधिक मुलं असली तर, संबंधित व्यक्तीला यापुढे सरकारी नोकरी मिळणार नाही, असा निर्णय घेतला आहे. हा निर्णय सोमवारी घेण्यात आला असून या निर्णयावर 1 जानेवारी 2021 पासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यासंदर्भातील संपुर्ण माहिती राज्याच्या जनसंपर्क विभागानं दिली. 

जनसंपर्क विभागाने घेतलेल्या निर्णयामध्ये लहान कुटुंबाच्या पद्धतीनुसार, १ जानेवारी २०२१ पासून दोनपेक्षा अधिक मुलं असल्यास सरकारी नोकरी दिली जाणार नाही, असं विभागानं प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे. सरकारी विद्यमान कर्मचाऱ्यांना हा निर्णय लागू होणार नाही. तर, जे उमेदवार सरकारी नोकरीसाठी अर्ज करणार आहेत. फक्त त्याच उमेदवारांसाठी हा निर्णय लागु होणार आहे. सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे वाद होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.   

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News