लग्न करण्याआधी हे सहा प्रश्न तुमच्या पार्टनरला जरूर विचारा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 12 June 2019

पुणे : अनेकदा असं होतं की, आपण आपल्या पार्टनरच्या एवढ्या प्रेमात पडतो की, अनेक महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. लग्न करण्याआधी आपण व्यक्ती, पैसा यासारख्या अनेक गोष्टींची चौकशी करतो. पण खरी गोष्ट म्हणजे एका खऱ्या नात्यामध्ये या गोष्टींपेक्षाही दुसऱ्या काही गोष्टींचीही गरज असते. जर आपण लग्न करत असाल तर आपल्या पार्टनर काही महत्त्वाचे प्रश्न जरुर विचारा. कारण यावर तुमचं वैवाहिक जीवन अवलंबून असतं. तर हे सहा प्रश्न तुमच्या पार्टनरला जरूर विचारा. 

१. तुमचा पार्टनर हा मानसिकदृष्ट्या लग्नासाठी तयार असणं गरजेचं आहे. तुमचा पार्टनर हा आई-वडिलांच्या दबावाखाली तर तुमच्याशी लग्न करत नाही ना हे त्याच्याकडून जाणून घ्या. 

२. होणाऱ्या पतीच्या नोकरीबाबत योग्य माहिती असणं आवश्यक आहे. अनेकदा फक्त ऐकिव माहितीवर विश्वास ठेऊ नये. नोकरीच नव्हे तर त्याच्या पगाराबाबतही माहिती असणं आवश्यक आहे. 

३. लग्नानंतर कुटुंबीयांसोबत एकत्र राहणार की वेगळं? हा प्रश्नही तुम्ही तुमच्या पार्टनरला विचारला पाहिजे. जर उत्तर देताना तुमचा जोडीदार दबावाखाली असेल तर त्याला नेमकं कारण विचारा. 

४. जर होणारा पती नोकरी करत नसेल तर त्याची गुंतवणूक आणि आर्थिक स्थिती याबाबतही जाणून घ्या. तो दुसऱ्या कुणावर अवलंबून तर नाही ना याची खात्री करून घ्या. 

५. आपल्या जोडीदाराची पसंत आणि नापसंत जाणून घेण्याचा प्रयत्न करा. कारण की त्याची एखादी आवड जर तुम्हाला पसंत नसेल तर भविष्यात त्या गोष्टीवरून तुमच्यात टोकाचे वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

६. लग्नाआधीच जाणून घ्या की, तुमचा जोडीदार फॅमेली प्लॅनिंगबाबत काय विचार करतो. मुलांना कधी जन्म द्यायचा हे जाणून घेणं अतिशय आवश्यक आहे. या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला मिळाली तर तुम्ही लग्नासाठी मानसिकदृष्ट्या पूर्ण तयार व्हाल.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News